Indian Railway: रेल्वे प्रवासात अनेकांना लोअर बर्थ म्हणजेच खालची सीट हवी असते. पण ती सहज मिळत नाही. लोअर बर्थ मिळवण्यासाठी IRCTC ची एक खास ट्रिक आहे, जी आम्ही तुम्हाला या गॅलरीमधून सांगणार आहोत.
भारतात बहुतेक लोक रेल्वे प्रवासालाच पसंती देतात. लांबच्या प्रवासासाठी आणि सोयीस्कर असल्यामुळे रेल्वे सगळ्यांना आवडते. पण तिकीट बुक करताना अनेकांना वरची सीट (अपर बर्थ) मिळते. यामुळे ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आणि महिलांची मोठी गैरसोय होते. मग त्यांना खालच्या सीटवरच्या प्रवाशाला सीट बदलण्याची विनंती करावी लागते.
25
तिकिटांचं बुकिंग कसं होतं?
तिकिट बुक करताना काही सोप्या गोष्टी फॉलो केल्या, तर तुम्हाला लोअर बर्थ मिळण्याची शक्यता वाढते. रेल्वेमध्ये सीट वाटप एका ऑटोमॅटिक कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे होतं. यात माणसाचा कोणताही हस्तक्षेप नसतो. ट्रेन धावताना तिचा बॅलन्स राखण्यासाठी सॉफ्टवेअर आधी मधल्या सीट्स (मिडल बर्थ) बुक करतं. त्यानंतर खालच्या आणि वरच्या सीट्स बुक होतात. आणि सगळ्यात शेवटी साईडच्या सीट्स बुक केल्या जातात.
35
‘रिझर्वेशन चॉईस’ ऑप्शन
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लोअर बर्थ देताना प्राधान्य दिलं जातं. पण यासाठी तिकीट बुक करताना तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. तिकीट बुक करताना 'रिझर्वेशन चॉईस' (Reservation Choice) या पर्यायामध्ये 'Book Only if Lower Berth Allotted' (फक्त लोअर बर्थ मिळाल्यास तिकीट बुक करा) हा ऑप्शन निवडा. हा ऑप्शन निवडल्यास, कॉम्प्युटरला लोअर बर्थ रिकामा दिसला तरच तुमचं तिकीट कन्फर्म होईल. जर लोअर बर्थ नसेल, तर तिकीट बुक होणार नाही. यामुळे नंतर अपर बर्थ मिळाल्याचा पश्चात्ताप होणार नाही.
कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी तिकीट काढताना नेहमी 'सिनियर सिटीझन' कोटा वापरा. या कोट्यातून बुकिंग केल्यास अनेकांना लोअर बर्थ मिळतो. समजा बुकिंगनंतरही तुम्हाला अपर बर्थ मिळाला, तर काळजी करू नका. जर प्रवासी ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग असेल, तर तुम्ही ट्रेनमधील TTE शी संपर्क साधू शकता. एखादी लोअर बर्थ सीट रिकामी असल्यास किंवा कोणी प्रवासी सीट बदलायला तयार असल्यास, ती सीट तुम्हाला देण्याचा अधिकार TTE ला असतो.
55
या दोन पद्धती लक्षात ठेवा
थोडक्यात सांगायचं तर, बुकिंग करण्यापूर्वी 'सिनियर सिटीझन' कोटा वापरून लॉग इन करा आणि मग तिकीट बुक करा. किंवा बुकिंग करताना 'बर्थ प्रेफरन्स' (Berth Preference) मध्ये लोअर बर्थचा ऑप्शन निवडा. हे छोटे बदल केल्यास तुमचा लांबचा प्रवास अधिक आरामदायक आणि आनंददायी होईल.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.