पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घट, किती रुपये स्वस्त इंधन मिळणार?

Published : Jul 01, 2026, 11:32 PM IST
Are petrol and diesel prices going to increase in our country because of Trump

सार

नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. यासोबतच, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतही १८३.५० रुपयांची घट झाली असून हे नवीन दर बुधवारपासून लागू होणार आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाले आहेत. नायरा एनर्जीच्या देशभरातील पेट्रोल पंपांवर हे भाव कमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त झालं असून डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झालं आहे. नायरा एनर्जीचे देशभरात जवळपास ७००० पेट्रोल पंप आहेत. मध्यंतरीच्या काळात पेट्रोलचे भाव कायमच वाढले होते.

मुंबईत सध्या पेट्रोल डिझेलचा रेट किती?

आपण मुंबईत सध्या पेट्रोल आणि डिझेलचा रेट किती आहे ते जाणून घेणार आहोत. आता मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलिटर भाव हा १११.२१ रुपये असून डिझेलचा भाव हा ९७.८३ रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदीचे नियम आता दूर करण्यात आले आहेत. एलपीजी सिलिंडरच्या दरात कंपनीच्या वतीने आता घट करण्यात आली आहे.

किती झाला एलपीजीचा भाव? 

आपण आता एलपीजीचा भाव किती झाला ते जाणून घेणार आहोत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. १९ किलोची गॅस सिलिंडरची किंमत १८३.५० रुपयांनी कमी झाली आहे. पाच किलोच्या लहान गॅस सिलिंडरच्या किंमतीत सहा रुपयांनी घट झाली आहे. बुधवारी सकाळपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Indian Railways Rules : रेल्वेचे आधार, तिकीट आणि लगेजचे नियम; प्रवाशांनो, ही माहिती नक्की वाचा!
Jio AI Glasses : आता चष्म्यातून करा UPI पेमेंट! जिओचा भन्नाट स्मार्ट ग्लासेस, वाचा डिटेल्स