नाराजीच्या चर्चांवर भुजबळांचं उत्तर, “मीडिया अफवा पसरवतं” | Chhagan Bhujbal | NCP | Politics

Published : May 14, 2026, 05:00 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीच्या चर्चांवर ज्येष्ठ नेते Chhagan Bhujbal यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मीडिया स्वतःच नाराजी निर्माण करतं,” असं म्हणत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरही भुजबळ म्हणाले की, त्यांना कोणतीही माहिती नाही. तसंच, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांचं समर्थन करत त्यांनी देशहितासाठी असे दौरे आवश्यक असल्याचं सांगितलं. साखर निर्यात बंदी, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि सरकारी ताफे कमी करण्याबाबतही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली.