Bengaluru Landlord: १.३ लाखांच्या डिपॉझिटमधून कापले १.११ लाख, बंगळुरुत घरमालकाचा अजब न्याय!

vivek panmand   | CMS
Published : Sep 14, 2026, 04:02 PM IST
banglore

सार

बंगळुरुमध्ये एका भाडेकरूला घर खाली करणं चांगलंच महागात पडलं आहे. घरमालकाने १.३ लाख रुपयांच्या डिपॉझिटमधून तब्बल १.११ लाख रुपये कापून घेतले. पेंटिंग आणि मेंटेनन्सच्या नावाखाली ही कपात केली असून, भाडेकरूने आता रेडिटवर मदतीसाठी धाव घेतली आहे.

बंगळुरु: बंगळुरुमध्ये भाड्याने घर शोधणं हे एक मोठं दिव्य असतं, पण घर सोडताना डिपॉझिटचे पैसे परत मिळवणं हे त्याहूनही मोठं आव्हान ठरतंय. असाच एक धक्कादायक प्रकार एका भाडेकरूसोबत घडला आहे. घरमालकाने त्याच्या १.३ लाख रुपयांच्या डिपॉझिटमधून तब्बल १.११ लाख रुपये कापून घेतले आणि हातावर फक्त १९ हजार रुपये टेकवले.

भाडेकरूची रेडिटवर व्यथा

या भाडेकरूने आपली कहाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर केली आहे. हा तरुण बिडाडी परिसरात एका ३ बीएचके घरात दोन वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तीन महिन्यांपूर्वी घरमालकाने त्याला घर खाली करण्यास सांगितलं. त्यानुसार, त्याने तीन महिन्यांनंतर घर खाली केलं.

घरमालकाचं गणित बघून भाडेकरू शॉक

घर खाली केल्यावर त्याने घरमालकाकडे १.३ लाख रुपयांच्या डिपॉझिटची मागणी केली. पण घरमालकाने त्याला फक्त १९,००० रुपयांचा चेक दिला. हे बघून भाडेकरूला धक्काच बसला. त्याने विचारल्यावर घरमालकाने खर्चाची एक मोठी लिस्टच त्याच्यासमोर ठेवली.

घरमालकाच्या म्हणण्यानुसार, घराला पुन्हा रंग (पेंटिंग) देण्यासाठी, घराची देखभाल (मेंटेनन्स), फ्लोअर क्लिनिंग आणि इतर काही दुरुस्तीसाठी तब्बल १.११ लाख रुपये खर्च आला. त्यामुळे उरलेले १९ हजार रुपयेच त्याला परत देण्यात आले.

भाडेकरूने खूप विनंती केली. 'पेंटिंग आणि शेवटच्या महिन्याचं १६ हजारांचं भाडं मिळून जास्तीत जास्त ४० हजार रुपये कापून घ्या आणि बाकीचे पैसे परत द्या,' अशी विनंती त्याने केली. पण घरमालकाने साफ नकार दिला. 'तुला १९ हजार दिले हेच खूप झालं,' असं तो उद्धटपणे म्हणाला.

भाडेकराराच्या कागदपत्रांमध्ये (Rent Agreement) अशा कोणत्याही अटीचा उल्लेख नाही, असं या भाडेकरूचं म्हणणं आहे. आता कायदेशीर मार्गाने काय करता येईल, या विचाराने त्याने रेडिटवर लोकांकडून सल्ला मागितला आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Berlin Marathon: बर्लिन मॅरेथॉनमध्ये चिनी इन्फ्लुएन्सरची चोरी पकडली, सायकलवरून मारली शॉर्टकट!
Morgan Stanley: मॉर्गन स्टॅनलीने MARA, RIOT, GLXY चे टार्गेट घटवले, तरीही १००% पेक्षा जास्त फायद्याची शक्यता