वेडं प्रेम! आई आणि नातेवाईक महिलांचे खासगी फोटो तरुणीने प्रियकराला पाठवले!

Published : Feb 09, 2026, 09:31 AM IST

Bengaluru girl sends mothers private photos to boyfriend : बंगळूरुमध्ये एका 23 वर्षीय तरुणीने आपल्या आई आणि मावशीचे खासगी फोटो काढून प्रियकराला पाठवले आहेत. ही गोष्ट पालकांना कळल्यावर तिने त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरला आहे. 

PREV
15
मुलीविरुद्ध आईने दाखल केली तक्रार

बंगळूरच्या बॅटरयानपुरा पोलीस ठाण्यात आईने मुलगी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या कृत्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

25
प्रेमाचं वेडेपण

23 वर्षीय रिशा (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणीने प्रियकर किरण (नाव बदलले आहे) याच्यासोबत तिच्या कुटुंबातील सदस्यांचे खासगी फोटो शेअर केले आहेत. आता तिने किरणशीच लग्न करण्याचा हट्ट धरला आहे.

35
काय आहे हे प्रकरण?

अलीकडेच रिशाने अभ्यासासाठी मोबाईल हवा म्हणून पालकांकडून घेतला होता. महिनाभरापूर्वी एका अनोळखी तरुणाशी बोलताना ती आईच्या हाती लागली. आईने मोबाईल मागितल्यावर रिशाने दिला नाही.

45
आई-मावशीचे फोटो

नंतर ही गोष्ट रिशाच्या वडिलांनाही समजली. वडिलांनी विचारल्यावर रिशाने मोबाईल दिला. यावेळी मोबाईल तपासल्यावर मुलीचे हे कृत्य उघड झाले. तिने घरात झोपलेल्या आई आणि मावशीचे फोटो काढले होते. हे फोटो तिने प्रियकर किरणला पाठवले होते.

55
फोटो डिलीट केले

याबद्दल विचारल्यावर तिने किरणशीच लग्न करणार असल्याचा हट्ट पालकांसमोर धरला. नंतर तिची समजूत काढून मोबाईलमधील कुटुंबाचे खासगी फोटो डिलीट करण्यात आले. आता आईने मुलगी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध बॅटरयानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories