Punjab Grenade Attack : भाजप ऑफिसवर ग्रेनेड हल्ला, बब्बर खालसाने स्वीकारली जबाबदारी

Published : Apr 02, 2026, 08:49 AM IST
Babbar Khalsa Claims Responsibility for Grenade Attack

सार

Babbar Khalsa Claims Responsibility for Grenade Attack : पंजाबमधील भाजप कार्यालयाला लक्ष्य करून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बंदी घातलेल्या बब्बर खालसा संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, एका एन्काउंटरचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे.

Babbar Khalsa Claims Responsibility for Grenade Attack : पंजाबमधील भाजप कार्यालयावर बुधवारी संध्याकाळी ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सुदैवाने, हा ग्रेनेड कार्यालयाजवळ ठेवलेल्या वाळूच्या पोत्यावर आदळला. त्यामुळे जवळच असलेल्या एका स्कूटरसह काही वाहनांचं किरकोळ नुकसान झालं, पण मोठी दुर्घटना टळली.

घटनेनंतर लगेचच NIA चं पथक घटनास्थळी दाखल झालं असून त्यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, बंदी घालण्यात आलेल्या बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बाईकवरून आलेल्या दोन व्यक्तींनी ग्रेनेड फेकल्याचे दृश्य जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

बदल्याची कारवाई:

गेल्या २२ फेब्रुवारी रोजी भारत-पाक सीमेवर एका ASI आणि एका होमगार्डची हत्या झाली होती. या प्रकरणात रणजीत सिंगसह तीन तरुण आरोपी होते. हत्येनंतर तीन दिवसांनी झालेल्या एन्काउंटरमध्ये रणजीतचा मृत्यू झाला होता. याच घटनेचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं बब्बर खालसा संघटनेने म्हटलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Jantar Mantar Protest : १३ कोटी मतं गायब? 'मी जेलमध्ये जायला तयार' - अभिजित दीपके
Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर काय आहेत? जाणून घ्या मुंबई-दिल्लीसह तुमच्या शहरातील आजच्या किंमती