ATF Price Hike : आता विमान प्रवासही महागणार? विमानाचे इंधन पहिल्यांदाच 2 लाखांपार

Published : Apr 01, 2026, 09:23 AM IST
ATF Price Hike Crosses Record 2 Lakh Mark

सार

ATF Price Hike Crosses Record 2 Lakh Mark : विमानाच्या इंधनाचे (ATF) दर प्रचंड वाढले असून, इतिहासात पहिल्यांदाच प्रति किलोलीटर २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा हा परिणाम आहे.

ATF Price Hike Crosses Record 2 Lakh Mark : विमानाच्या इंधनाचे (ATF) दर गगनाला भिडल्यामुळे आता विमान प्रवास चांगलाच महाग होणार आहे. आज दिल्लीत ATF चा दर प्रति किलोलीटर २,०७,३४१ रुपये झाला आहे. मार्च महिन्यात हाच दर ९६,६३८ रुपये होता. म्हणजे दरात दुप्पटपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या दरवाढीचा परिणाम थेट तिकीट दरांवर दिसून येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

पश्चिम आशियातील युद्ध पेटल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर प्रचंड वाढले. विमानाच्या इंधनात तब्बल ११५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच ATF चा दर प्रति किलोलीटर २ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळेच विमानाच्या इंधनाने हा रेकॉर्ड केला आहे. देशांतर्गत विमानसेवांच्या इंधनाच्या दरात सुमारे ११५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवांच्या दरात सुमारे १०७ टक्के वाढ झाली आहे. केंद्र सरकारने याआधीच देशांतर्गत विमान तिकीट दरांवरची मर्यादा हटवली होती. त्यामुळे आता विमान कंपन्यांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे दर ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.

याआधी इंडिगोच्या विमानसेवेत अचानक अडथळा आल्याने तिकीट दरात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये केंद्राने देशांतर्गत दरांवर मर्यादा घातली होती. आता ही मर्यादा हटवल्याने आणि त्यात इंधन दरवाढ झाल्याने विमान प्रवासासाठी मोठी किंमत मोजावी लागणार हे निश्चित आहे. अवाजवी किंवा अन्यायकारक दरवाढ गांभीर्याने घेतली जाईल आणि गरज पडल्यास जनतेच्या हितासाठी पुन्हा मर्यादा लागू केली जाईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

IOC, BPCL आणि HPCL च्या डॉलरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी RBI ची नवी सुविधा
EaseMyTrip : ईझमायट्रिपची 'योलो बस एक्सप्रेस' सुरू, आता बस प्रवास होणार आणखी सुखकर