
Baba Ramdev Wrestles Journalist On Live TV Video : बाबा रामदेव यांनी एका पत्रकाराला पायात पाय अडकवून खाली पाडण्याचा प्रयत्न केला. पण, त्या पत्रकाराने हार न मानता योगगुरूंनाच उचलून जमिनीवर आपटले. लाईव्ह चर्चेदरम्यान योगगुरू बाबा रामदेव यांनी पत्रकारासोबत कुस्ती खेळण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. एका खासगी मीडिया संस्थेने 'भारत संवाद' नावाच्या लाईव्ह शोचे आयोजन केले होते, ज्यादरम्यान ही अनपेक्षित घटना घडली. कार्यक्रमादरम्यान रामदेव यांनी तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराला कुस्तीसाठी मंचावर बोलावले. मध्य प्रदेशातील इंदूर येथील जयदीप कर्णिक नावाच्या पत्रकाराने रामदेव यांचे आव्हान स्वीकारले. या लाईव्ह कुस्तीचा १८ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जयदीप कर्णिक यांना कुस्तीचा अनुभव आहे, हे माहीत नसल्याने बाबा रामदेव यांनी त्यांच्याशी कुस्ती खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, जयदीप यांनी हार न मानता रामदेव यांचा पाय अडकवून पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी केला.
व्हिडिओमध्ये पत्रकार बाबा रामदेव यांना खाली पाडताना दिसत आहे आणि त्यानंतर बाबा रामदेव हे आपण मुद्दामहून हार मानल्याचे सांगत आहेत. हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर, आपण हे सर्व गंमतीने केले होते, अशी प्रतिक्रिया योगगुरूंनी दिली आहे. सामन्यादरम्यान एका क्षणी रामदेव यांनी जयदीप यांना जमिनीवर पाडले होते, पण जयदीप यांनी लगेचच स्वतःला सावरले आणि जोरदार प्रत्युत्तर दिले, त्यानंतर बाबा रामदेव यांनी माघार घेतल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.