
Andhra Pradesh Road Accident : आंध्र प्रदेशातून सध्याची सर्वात मोठी बातमी येत आहे. येथील अल्लुरी जिल्ह्यातील चिंतूर घाट रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका खाजगी ट्रॅव्हल बसने नियंत्रण गमावले आणि ती दरीत कोसळली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना भद्राचलम एरिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की ही बस चिंतूरहून मारेदुमिल्लीला जात होती. मारेदुमिल्लीतील तुलसी पकाळाजवळ हा अपघात झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघाताच्या वेळी बसमध्ये ३७ प्रवासी होते.
वृत्तानुसार, चित्तूरमध्ये ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वाटसरूने अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आणि इतरांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, वेगाने येणारी बस नियंत्रण गमावून खोल दरीत कोसळली, ज्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला. भद्राचलम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर प्रवासी अन्नावरमला जात होते. सर्व बळी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील असल्याचे मानले जात आहे.