पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीने जिंकले मन, उपस्थित लोकांनी केला नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयजयकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेलंगणा येथील सभेतील कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी दिव्यांग महिलांना पुढे बसायला जागा देऊन त्यांचा सन्मान केला. 

vivek panmand | Published : May 10, 2024 2:25 PM IST / Updated: May 10 2024, 08:24 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महबूबनगर, तेलंगणातील जाहीर भाषणात वाच्यता केली आहे. त्यांनी एका कृतीने येथील लोकांचे मन जिंकून घेतले आहे. पंतप्रधानांनी येथे सभेला उपस्थित असणाऱ्या महिलांना पुढच्या रांगेत जागा देऊन त्यांचा गौरव केला आहे. 

नरेंद्र मोदींच्या कोणत्या कृतीने जिंकले मन - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी काही अपंग महिला आल्या होत्या. त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष करत होत्या. त्यांच्याकडे नरेंद्र मोदी यांचे लक्ष गेल्यानंतर त्यांच्यासाठी जागा करून देण्यासाठी त्यांनी सांगितल. त्यांना बसायला जागा दिल्यानंतर सगळ्या लोकांचे मन जिंकून घेतले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सगळीकडे तो व्हायरल झाला आहे. 

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, "दोन- तीन विशेष दिव्यांग बहिणी मला आशीर्वाद देण्यासाठी येथे आल्या आहेत. कृपया त्यांच्यासाठी जागा द्या. अवघड जात असेल तर समोर असलेल्या लोकांनी थोडं बाजूला सरकून घ्यावे. जोपर्यंत या बहिणींना बसायला जागा भेटत नाही तोपर्यंत मी त्यांचा त्रास बघू शकणार नाही, कृपया त्यांना लवकर बसायला जागा करा. नरेंद्र मोदी यांच्या कृतीने उपस्थित लोकांची मने यावेळी जिंकून घेतली आहेत. 

नरेंद्र मोदी सभेत काय म्हणाले? - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांची पोलखोल केली आहे. त्यांनी भाजप सरकारने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण केल्याचा दावा यावेळी केला. तेलंगणातील लोकांना हे माहित आहे की ही निवडणूक देशाच्या भविष्याशी संबंधित असून ते योग्य उमेदवारालाच मतदान करणार आहेत. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी भाजप सरकार सक्षम असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. 
अधिक वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीने जिंकले मन, उपस्थित लोकांनी केला नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयजयकार
UPSC 2023 प्रिलिम्सची Answer Key झाली जाहीर, 28 मे 2023 ला झाली होती परीक्षा

Share this article