वायरल न्यूज, Dolly Chaiwala dominates till America । बिल गेट्सना चहा देण्यांनतर डॉली चायवाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी बनला आहे. आता त्याला परदेशात कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले जाते. तो एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ५ लाख रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारतो. सोशल मीडियाने डॉली चायवालाच्या स्टाईलला घराघरात पोहोचवले आहे. आता तर अमेरिकनही त्याच धर्तीवर घरात चहा देऊ लागले आहेत. नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक अमेरिकन महिला जेसिका भारतीय चायवाला डॉलीची नक्कल करताना दिसत आहे.
@the_vernekar_family द्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जेसिका अगदी भारतीय स्टाईलमध्ये चहा आणि समोस्यांची ट्रे घेऊन ओरडत आहे, "चहा, चहा। समोसा, समोसा। भजी, भजी। चटणी, चटणी!" या दरम्यान ती डॉली चायवाला प्रमाणेच नाचताना दिसते. व्हिडिओ शूट करणारे जेसिकाचे पती तिला ट्रे न पाडण्यासाठी सावध करत आहेत. पण जेसिका आपल्याच धुंदीत मग्न आहे. तिने चहाही स्वतःच्या स्वयंपाकघरात बनवला आहे. यावेळी तिचे पती विचारतात की ती प्रसिद्ध "डॉली चायवाला" ची नक्कल करत आहे का, तेव्हा ती नाही म्हणत स्वतःला "जेसिका चायवाला" सांगते. यात अमेरिकन ट्विस्ट जोडत ती त्याला "मलाईदार चहा" असेही म्हणते.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला "डॉली अमेरिकन चायवाला" असे कॅप्शन देण्यात आले आहे, जे आता वेगाने व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम युजर्सनी हा क्रिएटिव्ह आयडिया असल्याचे म्हटले आहे. तर अनेक युजर्सनी डॉली चायवालाला भारताचा ब्रँड अँबेसेडर बनवण्याची मागणीही केली आहे. एका नेटिझनने म्हटले - काहीही असो, भारतीयांच्या चहा आणि समोस्यांना डॉलीने अमेरिकन लोकांच्या रुटीनमध्ये जोडले आहे.