Ahlan Modi : PM नरेंद्र मोदी UAEमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार, 60 हजारहून अधिक लोकांनी केली नोंदणी

PM Narendra Modi : अबु धाबी येथे भारतीय समुदायातर्फे 'अहलान मोदी' नावाचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.

Harshada Shirsekar | Published : Feb 3, 2024 8:01 AM IST / Updated: Feb 03 2024, 03:07 PM IST

PM Narendra Modi : अबु धाबी येथे भारतीय समुदायातर्फे 'अहलान मोदी' नावाचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. 

ऐतिहासिक कार्यक्रम

‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय जागतिक दृष्टिकोनाला मूर्त स्वरूप देत भारत आणि UAE मधील एकता व मैत्रीचे नाते साजरे करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम 13 फेब्रुवारी रोजी अबुधाबीच्या झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडिअमवर पार पडणार आहे. हा कार्यक्रम समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परदेशस्थ भारतीयांचे प्रतीक असलेल्या सर्वसमावेशकतेची पुष्टी करतो.

या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 60 हजारहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा याकरिता आयोजन समिती अबु धाबीमधील संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत.

भारत-UAEमधील मैत्री

भारत आणि यूएईमध्ये सखोल मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यात परदेशातील भारतीय समुदाय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यूएईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड पाठिंबा आहे. हे व्यक्त करण्यासाठी एनआरआय समुदायातर्फे 'अहलान मोदी' नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भारतीय शाळा आणि विद्यार्थी गटांचा सहभाग आहे. अशा उपक्रमांमुळे तरुणांना त्यांचा वारसा रुजण्यास मदत मिळेल. यासोबतच त्यांना देशाच्या प्रगतीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण  

'नारी शक्ती'चा प्रचंड उत्साह

अहलान मोदी कार्यक्रमाकरिता भारतीय समुदायातील 'नारी शक्ती'ने विविधतेतील एकता कार्यक्रमाला प्रचंड पाठिंबा आणि उत्साह दर्शवला आहे. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. महिला सक्षमीकरण, जातीय सलोखा आणि सहभागाच्या भावनेला या कार्यक्रमाद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे.

विविधतेतील एकतेचा उत्सव - पीएनसी मेनन

शोभा रियल्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष पीएनसी मेनन यांनी या कार्यक्रमाविषयी बोलताना सांगितले की, "अहलान मोदी हा केवळ एक कार्यक्रम नव्हे. तर हा विविधतेतील एकतेचा उत्सव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अशा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. हा कार्यक्रम करणे हा एक सन्मान आहे, जो भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणार आहे. या अविस्मरणीय सोहळा यशस्वी होण्यासाठी मी शुभेच्छा देतो. हे क्षण भारत-यूएईच्या मैत्री इतिहासात कोरले जातील.

या कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा एक संस्मरणीय क्षण म्हणून इतिहासामध्ये नोंद होणार आहे. यूएई आणि जगभरातील भारतीय समुदायावर हे क्षण कायमची छाप सोडतील. या अद्भुत उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सर्वांना मनापासून आमंत्रित करतो. हा एक असा कार्यक्रम असेल जो एकता, मैत्री आणि भारतीय संस्कृतीच्या जिवंतपणाचे चैतन्य चैतन्य दर्शवेल.

आयोजन समितीमध्ये समर्पित स्वयंसेवक आणि समुदाय नेत्यांचा समावेश आहे. जे भारतीय संस्कृतीचा विकास व भारत आणि UAE मधील संबंध मजबूत करण्याच्या ध्येयामध्ये एकत्रित आहेत.

आणखी वाचा : 

LK Advani : BJPचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, PM नरेंद्र मोदींची घोषणा

इराक-सीरियातील इराण समर्थित गटांवर अमेरिकेचा एअरस्ट्राईक, 18 ठार

Interim Budget 2024: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लक्षद्वीपसह अन्य बेटांकरिता मोठी गुंतवणूक - निर्मला सीतारमण

Share this article