वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून येथील अनेक लोकांना विस्थापित करण्यात आले आहे. येथे झालेल्या या दुर्घटनेमुळे आतापर्यंत २७६ लोकांना त्यांचा प्राण गमवावा लागला आहे.
वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून येथील अनेक लोकांना विस्थापित करण्यात आले आहे. येथे झालेल्या या दुर्घटनेमुळे आतापर्यंत २७६ लोकांना त्यांचा प्राण गमवावा लागला आहे. २ दिवसांपासून येथे एनडीआरएफ आणि आर्मीच्या वतीने बचाव योजना राबवली जात असून एक मन हेलावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ऍम्ब्युलन्स बॉडी घेऊन जाताना दिसून आली आहे. या व्हिडीओमुळे सगळीकडे दुःख व्यक्त केले जात आहे.
ट्रॅफिकमधून काढला ऍम्बुलन्सने रस्ता -
वायनाडमध्ये आतापर्यंत जवळपास २७६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये येथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. वायनाड येथून मृतदेह घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. एक माणूस रस्त्याच्या कडेला छत्री घेऊन उभा असून अँब्युलन्सला रस्ता करून देत असल्याचे दिसून आले आहे.
दरड कोसळण्याच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली
वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेवर आवश्यक पावले उचलण्यासाठी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला सर्व मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज खुद्द राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही वायनाडला भेट देत आहेत. दोन्ही नेते पीडितांची भेट घेणार आहेत.
पाऊस थांबला नाही तर धोका होऊ शकतो
केरळमध्ये पाऊस थांबत नाहीये. अशा स्थितीत हवामान असेच राहिल्यास आणि पावसाचा जोर वाढत राहिल्यास पुन्हा दरड कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. असे झाले तर परिस्थिती आणखी बिकट होईल.