Pension Delayed: शिक्षक दिनीच ९४ वर्षीय रिटायर्ड शिक्षकाची पेन्शन थांबली, ३८ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं!

vivek panmand   | CMS
Published : Sep 06, 2026, 06:06 PM IST
teacher

सार

teacher: गेली ३८ वर्षे पोस्ट ऑफिसमधून नियमितपणे पेन्शन घेणाऱ्या एका ९४ वर्षीय रिटायर्ड शिक्षकांना यंदा शिक्षक दिनाच्या तोंडावर पेन्शन मिळालेली नाही.

एकीकडे देशभरात शिक्षक दिन साजरा होत असताना, केरळमधील एका ९४ वर्षीय रिटायर्ड शिक्षकाची पेन्शन थांबवण्यात आली आहे. पी. के. गोपीनाथन नायर असं या शिक्षकाचं नाव असून, ते पूर्वी जिल्हा शिक्षण अधिकारीही होते. ते एडथुआमधील थलवाडी येथील 'आनंदाललयम' घरात राहतात.

गेली ३८ वर्षे त्यांना पोस्ट ऑफिसमार्फत वेळेवर पेन्शन मिळत होती. पण या महिन्यात ती मिळाली नाही. शनिवारी दुपारी पोस्टमन घरी आले, तेव्हा त्यांनी पेन्शनची रक्कम आलेली नाही, असं सांगितलं. नायर यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांना रोजच्या कामांसाठी दुसऱ्यांच्या मदतीची गरज लागते. अशा परिस्थितीत पेन्शन थांबल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे, असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी शिक्षकांच्या कामाचा गौरव केला जातो, त्याच शिक्षक दिनी हा प्रकार घडल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे. पेन्शन का थांबली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. संबंधित विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून थकबाकीसह संपूर्ण पेन्शन लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

एशियानेट न्यूज लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PREV
Read more Articles on

Recommended Stories

रशियन, जर्मनीच्या बायका पोहोचल्या नदीकाठी पिंडदानाला Russian Perform Pind Daan Rituals
Painkiller Smuggling: तामिळनाडूत ७५ लाखांच्या पेनकिलर्स जप्त, श्रीलंकेला होत होती तस्करी