एशियानेट न्यूजवर आजच्या ठळक बातम्यांचे अपडेट्स…

11:48 PM (IST) May 07
बागेश्वर धाम सरकार आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशभरात झालेल्या नागरी संरक्षण मॉक ड्रिल दरम्यान सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "सावधगिरी म्हणजे सुरक्षितता".
11:35 PM (IST) May 07
६ मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले ज्यात मरकज सुभान अल्लाहचा समावेश होता. हे जैश-ए-मोहम्मदचे कमांड सेंटर आहे जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते.
10:11 PM (IST) May 07
09:03 PM (IST) May 07
08:40 PM (IST) May 07
08:35 PM (IST) May 07
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशस्वीतेबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. त्यांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि भारताला मिळालेल्या जागतिक पाठिंब्याचे कौतुक केले.
08:09 PM (IST) May 07
मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे.
07:50 PM (IST) May 07
शरद पवार यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन केले आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांशी संवाद साधून अभिनंदन व्यक्त केले.
06:42 PM (IST) May 07
फवाद खानने 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना केल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
06:39 PM (IST) May 07
जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे नियंत्रण रेषे जवळ पाकिस्तानी सैन्याने गुरुद्वारावर हल्ला केल्याने तीन शीख नागरिकांचा मृत्यू झाला. शिरोमणी अकाली दलाने या हल्ल्याचा निषेध केला आणि बळींना शहीद म्हणून मान्यता देण्याची मागणी केली.
06:14 PM (IST) May 07
भारत सरकारच्या सूचनेनंतर उत्तर आणि पश्चिम भारतातील २० विमानतळांवरील नागरी उड्डाणे १० मे सकाळी ५:२९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.
05:56 PM (IST) May 07
05:50 PM (IST) May 07
पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश: भारतीय सैन्याने 'सिंदूर' ऑपरेशनमध्ये २१ ठिकाणी हल्ला करून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यविधीत सहभागी झाले.
05:04 PM (IST) May 07
04:36 PM (IST) May 07
राज ठाकरे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रश्न उपस्थित करत दहशतवादी हल्ल्यांना युद्ध हा उपाय नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आतंरिक सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यावर आणि दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करण्यावर भर दिला आहे.
04:21 PM (IST) May 07
03:48 PM (IST) May 07
02:49 PM (IST) May 07
'ऑपरेशन सिंदूर' क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या सशस्त्र दलांना 'प्रत्युत्तर कारवाई' करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
02:49 PM (IST) May 07
02:42 PM (IST) May 07
उत्तर प्रदेशातील एका नववधूचा हळदीत डान्स करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नववधुच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे.
02:41 PM (IST) May 07
नवी दिल्ली - ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, नियंत्रण रेषेवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला, ज्यात १० नागरिकांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
01:14 PM (IST) May 07
Civil Defense Mock Drill : ७ मे रोजी देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, ही ड्रिल लोकांना आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्याचे मार्ग शिकवले जातील.
01:06 PM (IST) May 07
Jaish-e-Mohammed headquarters destroyed : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला, ज्यात मसूद अजहरच्या कुटुंबाला लक्ष्य केले गेले. अजहरने दुःख व्यक्त करत म्हटले आहे की, "काश मीही मारला गेलो असतो."
12:39 PM (IST) May 07
Sanjay Raut on Operation Sindoor : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांचे गड उधळून लावले आहेत.यावर खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्यासह केंद्रावरही टीका केली आहे.
12:19 PM (IST) May 07
या पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारतीय लष्कराची बाजू मांडली.
11:59 AM (IST) May 07
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, एकूण नऊ दहशतवादी ठिकाणे लक्ष्य करून यशस्वीरित्या नष्ट करण्यात आली. नागरिकांचे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांचे नुकसान होऊ नये म्हणून ही ठिकाणे निवडण्यात आली होती.
11:52 AM (IST) May 07
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या नऊ प्रमुख दहशतवादी अड्ड्यांवर लक्ष्यित लष्करी कारवाई 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केली.
11:15 AM (IST) May 07
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या आधारभूत ठिकाणांवर भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी एका सूचक पोस्टद्वारे पाकिस्तानला इशारा दिला आहे.
11:08 AM (IST) May 07
10:51 AM (IST) May 07
10:38 AM (IST) May 07
सेना, वायुसेना आणि MEA च्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे.
10:33 AM (IST) May 07
10:23 AM (IST) May 07
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. ९ मोठे तळ उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यात जैश आणि लष्करचे लॉन्चपॅड्सचा समावेश आहे. यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
10:14 AM (IST) May 07
पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या कारवाईचे पाहलगाम हल्ल्यातील पीडित कौस्तुभ गणबोटे यांचे पुत्र कुणाल गणबोटे यांनी स्वागत केले आहे.ॉ
08:49 AM (IST) May 07
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी हल्ला केल्यानंतर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
08:34 AM (IST) May 07
Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे यांनी सरकार आणि भारतीय सैन्याने घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
06:12 AM (IST) May 07
India Strikes: भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ आतंकी अड्ड्यांवर हल्ला केला. राफेल विमानांनी SCALP क्षेपणास्त्र आणि हॅमर बॉम्बने हाहाकार माजवला. हा पहलगाम हल्ल्याचा बदला आहे का?
06:07 AM (IST) May 07
विशेषतः विवाहित महिलांचे पती या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले, ज्यामधून केवळ जीव घेण्याचा नव्हे, तर भारतीय संस्कृतीवर आणि कुटुंबव्यवस्थेवर घाव घालण्याचा उद्देश स्पष्ट दिसून आला.
06:05 AM (IST) May 07
India strikes: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि PoK मधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, भारताने हा हल्ला आत्मरक्षणासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
05:49 AM (IST) May 07
‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले.