शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...
एशियानेट न्यूज पोर्टलवर 6 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
Chanda Mandavkar | Published : Sep 6, 2024 2:49 AM IST / Updated: Sep 06 2024, 10:22 AM IST
शरदचंद्र पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संभाजीनगरातील एमआयडीसी वाळूज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह शेतकऱ्यांना मदत करण्याची खोटी माहिती देत दिशाभुल करत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आनंद दुबे यांनी बदलापूरमध्ये दिवसाढवळ्या रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबारावर विधान केले आहे. आनंद दुबे यांनी म्हटले की, बदलापूरमध्ये गोळीबाराची घटना घडली. यावरुन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत असा सवाल उपस्थितीत केला आहे. याशिवाय राज्यातील नियम आणि कायदे ढाब्यावर बसवल्याची टीकाही आनंद दुबे यांनी केली आहे.
कोलकातामधील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राध्यमापक संदीप घोष यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे.
मुंबईतील लोअर परेल भागातील टाइम्स टॉवरला आग लागल्याची दुर्घटना आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झालेले नाही. पण घटनास्थळी अग्निशमन पथाच्या 9 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम केले जात आहे.
दिल्लीतील काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
फेडरल टॅक्स प्रकरणात जो बिडेन यांचा मुलगा हंटर 9 आरोपांसह दोषी ठरला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी 25 पोलीस अधिकारी, आयपीएस प्रोबेशनर्सच्या बदल्या करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशात आणखी एका 10 वर्षाच्या मुलावर लांडग्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बहराइच येथे लांगड्यांचा वावर वाढला असून काही लांडग्यांना पकडण्यात यशही आले. पण 8 जणांचा लांडग्यांच्या हल्ल्यात मृत्यूही झाला आहे.
मुंबईतील दिंडोशी येथील एका बांधकामाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्या प्रकरणात 5 जणांच्या विरोधात विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत.