नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये मंगळवारी झालेल्या अपघातात पाच जवान शहीद झाले. ऑपरेशनल ड्युटी दरम्यान हा अपघात झाला.दरम्यान, बचावकार्य सुरू असून जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत.
"व्हाइट नाइट कॉर्प्सच्या सर्व श्रेणींनी पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्यूटी दरम्यान वाहन अपघातात पाच शूर सैनिक शहीद झाल्याने तीव्र शोक व्यक्त केला आहे. बचाव कार्य चालू आहे आणि जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे," असे व्हाईट नाइट कॉर्प्सने एक्स वर लिहिले आहे.