Foot Pain Relief: दुर्गा पूजेत रात्रभर फिरून पाय दुखतायत? या ५ उपायांनी मिळवा आराम

vivek panmand   | CMS
Published : Oct 22, 2026, 10:26 PM IST
Foot Pain Relief: दुर्गा पूजेत रात्रभर फिरून पाय दुखतायत? या ५ उपायांनी मिळवा आराम

सार

दुर्गा पूजेत रात्रभर पेंडॉल हॉपिंग करून तुमचेही पाय दुखतायत का? पाय सुजलेत आणि दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडणं कठीण झालंय? टेन्शन घेऊ नका, काही मिनिटांत आराम मिळवण्यासाठी हे ५ सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

दुर्गा पूजा म्हणजे रात्रभर पेंडॉल हॉपिंग. नवीन शूज, हाय हिल्स, तासन् तास रांगेत उभं राहणं आणि त्यानंतर पायांच्या असह्य वेदना. सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी संपली की सकाळी पाय जमिनीवर ठेवणंही कठीण होतं. या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या औषधांची गरज नाही, घरच्या घरी काही मिनिटांत तुम्हाला आराम मिळेल.

हे आहेत ५ सोपे उपाय

१. गरम पाण्यात मीठ टाकून पाय शेका: हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. एका बादलीत सोसवेल इतकं गरम पाणी घ्या, त्यात २ चमचे मीठ (शक्यतो सैंधव मीठ) टाका. १५-२० मिनिटे पाय त्यात बुडवून ठेवा. पायांच्या स्नायूंमधील ताण आणि सूज लगेच कमी होईल. रक्तप्रवाह सुधारेल आणि थकवा दूर होईल.

२. बर्फाचा शेक: जर पाय सुजले असतील किंवा टाचांमध्ये खूप वेदना होत असतील, तर बर्फाचा शेक खूप फायदेशीर ठरतो. एका सुती कपड्यात बर्फाचे काही तुकडे गुंडाळा आणि पायाच्या तळव्यांना, टाचांना ५-७ मिनिटे शेका. सलग बर्फ लावू नका, दर १ मिनिटाने थोडा ब्रेक घ्या.

३. मोहरीच्या तेलाची मालिश: हा आजीच्या बटव्यातील उपाय असला तरी आजही बेस्ट आहे. रात्री झोपण्यापूर्वी थोडं कोमट मोहरीचं तेल घ्या आणि पायाच्या तळव्यांपासून गुडघ्यापर्यंत ५ मिनिटे मालिश करा. तेल कोमट असल्यामुळे स्नायू रिलॅक्स होतात आणि वेदना कमी होतात. त्यानंतर सॉक्स घालून झोपा, सकाळी पाय एकदम हलके वाटतील.

४. पाय उंचावर ठेवा: दिवसभर चालून घरी आल्यावर १० मिनिटे भिंतीला पाय लावून उंचावर ठेवा. किंवा पायांखाली २ उशा घेऊन झोपा. यामुळे पायात साचलेलं पाणी आणि सूज कमी होते. ज्यांना व्हेरिकोज व्हेन्स किंवा पाय सुजण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे.

५. स्ट्रेचिंग: शूज काढा आणि जमिनीवर एक टेनिस बॉल किंवा पाण्याची बाटली ठेवून पायाच्या तळव्याने २ मिनिटे रोल करा. पायाची बोटं ताणून स्ट्रेच करा. या छोट्याशा व्यायामाने पायात आलेला ताण पूर्णपणे निघून जाईल.

हे छोटे छोटे नियम पाळले तर पायांच्या वेदना तुमच्या दुर्गा पूजेच्या आनंदात कोणताही अडथळा आणू शकणार नाहीत. त्यामुळे पायांना आराम द्या आणि पुढच्या वर्षीची पूजाही अशीच एन्जॉय करा.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Goa AI Policy: गोव्याचे नवे एआय धोरण जाहीर, हॅकेथॉन आणि कोकणी मॉडेलवर भर
Golden Star Ganesh: 'कॉमेडी टाईम' शो नको होता, पण गणेशला तो कसा मिळाला?