2st May 2025 Live Updates : एशियानेट न्यूज मराठीवर आजच्या ताज्या घडामोडी, ठळक बातम्यांचा आढवा घ्या
11:26 PM (IST) May 02
महाराष्ट्र शासनाने राज्य अॅग्रीगेटर कॅब धोरण २०२५ अंतर्गत एक नवे आदेश लागू केले आहे, ज्यामुळे ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांना ड्रायव्हरने राईड रद्द केल्यास प्रवाशाला भरपाई देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
11:08 PM (IST) May 02
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि पाकिस्तानला हल्लेखोरांना शोधण्यात सहकार्य करण्याचे आणि मोठ्या प्रादेशिक संघर्ष टाळण्याचे आवाहन केले.
08:39 PM (IST) May 02
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा कट, पाकिस्तानी दहशतवादी आणि स्थानिक ओजीडब्ल्यूचा सहभाग, थ्रीडी मॅपिंग आणि सॅटेलाइट फोन डेटाचे महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले आहेत.
08:09 PM (IST) May 02
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेजवळ सैन्य हालचाली आणि सराव वाढवले आहेत. या सरावांमध्ये लढाऊ विमाने, तोफखाना आणि हवाई संरक्षण समाविष्ट आहे, ज्यामुळे भारत जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करीत असताना तणाव वाढला आहे.
07:07 PM (IST) May 02
06:45 PM (IST) May 02
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावतीमध्ये ५८,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, क्षेपणास्त्र चाचणी केंद्र आणि पीएम एकता मॉल यांचा समावेश आहे. यामुळे संपर्क आणि संरक्षणाला चालना मिळेल.
05:35 PM (IST) May 02
05:06 PM (IST) May 02
शहरातील अंधेरी परिसरात शुक्रवारी (२ मे) सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात ३५ वर्षीय दुचाकीस्वार इसमाचा डावा हात बीईएसटी बसखाली येऊन तुटला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमावर होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
05:04 PM (IST) May 02
04:28 PM (IST) May 02
मुंबई - वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज् संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.
03:58 PM (IST) May 02
03:44 PM (IST) May 02
03:20 PM (IST) May 02
02:22 PM (IST) May 02
महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी अदिबा अनमने यूपीएससी परीक्षेत १४२ वा क्रमांक मिळवला. ऑटो रिक्षाचालकाची मुलगी असलेल्या अदिबाने दोन वेळा अपयशानंतरही हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.
01:57 PM (IST) May 02
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. राऊत यांनी देशातील सुरक्षा स्थिती, दहशतवादी हल्ले, आणि त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
01:25 PM (IST) May 02
पुणे जिल्ह्यातील वर्वंड गावातील शेतकरी सागर शिंदे यांनी जपानच्या प्रसिद्ध मियाझाकी आंब्याची यशस्वी लागवड केली आहे. 'एग ऑफ द सन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आंब्याला देश-विदेशातून मागणी वाढली.
12:10 PM (IST) May 02
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२ मे) ८,९०० कोटी रुपयांच्या विझिंजम आंतरराष्ट्रीय खोल पाण्याच्या बहुउद्देशीय बंदराचे उद्घाटन केले. भारताच्या सागरी पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.
11:24 AM (IST) May 02
पाकिस्तानी सिनेटर पलवाशा महंमद झई खान यांनी बाबरीची वीट पुन्हा ठेवण्याची भाषा केली केली. त्यावर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी तुमचा बाप हिंदुस्तानात बसला आहे, असे म्हटले आहे.
10:26 AM (IST) May 02
10:20 AM (IST) May 02
विझिंजम बंदर देशाला समर्पित करण्यासाठी आता काही तास उरले आहेत. रात्री साडेसातच्या सुमारास पंतप्रधानांचे विमान तिरुवनंतपुरम येथे पोहोचले.
09:50 AM (IST) May 02
09:34 AM (IST) May 02
उत्तराखंडमधील श्री केदारनाथ धामची दारे शुक्रवारी सकाळी ७ वाजता भाविकांसाठी खुली झाली. यावेळी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांचे स्वागत केले. भारतीय सैन्याच्या बँडने भक्तीगीते वाजवली.
09:22 AM (IST) May 02
भू-राजकीय तणाव आणि जागतिक मंदी असूनही, २०२५ च्या पहिल्या चार महिन्यांत मुंबईच्या मालमत्ता नोंदणीने नवे उच्चांक गाठले आहेत. जानेवारी ते एप्रिल २०२५ मध्ये मुंबईत मालमत्ता नोंदणीतून मिळालेले एकूण महसूल आणि एकूण नोंदणी विक्रमी उच्चांकावर होती.
08:48 AM (IST) May 02
मुंबईचा सागरी किनारा रस्ता प्रकल्पात मे महिन्यात आणखी तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. दक्षिण मुंबई ते दहिसर प्रवास जलद आणि सुलभ होणार असून, नरिमन पॉइंट ते वांद्रे-वरळी सी लिंक दरम्यान वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
08:19 AM (IST) May 02