2nd June 2025 Live Updates : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आपल्या परिवारासोबत केदारनाथ येथे पोहोचल्या आहेत. याशिवाय लाइबेरामध्ये गेलेल्या शिष्टमंडळातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, पहिल्यांदाचा एखादा देश दशतवादाविरोधात शिष्टमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण जगात शांतीचा संदेश देण्याचे काम करत आहे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एशियानेट न्यूजचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा…

09:42 PM (IST) Jun 02
आता आयआरसीटीसीने गुजरात टूर पॅकेज आणले आहे. त्यामुळे केवळ २१ हजार रुपयांमध्ये तुम्हाला गुजरातची सफर करणे शक्य होणार आहे.
08:34 PM (IST) Jun 02
अशा लोकांसाठी एक अत्यंत आनंदी बातमी समोर आली आहे. आता मानवी स्पर्मही लॅबमध्ये तयार करता येणार आहे.
08:23 PM (IST) Jun 02
आयुष्यात एकदा तरी परदेश फिरण्याची इच्छा प्रत्येकाला असतेच. तुम्हालाही परदेश जायचं असेल तर वियतनामची एअरलाइन अगदी स्वस्तात तिकिटं देत आहे. फक्त ११ रुपयांत परदेश फिरण्याची ही संधी कशी मिळणार ते जाणून घ्या.
08:17 PM (IST) Jun 02
IPL 2025 मध्ये फक्त फलंदाजांचाच नाही तर गेंदबाजांचाही दबदबा होता. एकापेक्षा एक सरस गेंदबाज होते ज्यांनी विकेट्सची रांग लावली. चला तर मग, या ५ पर्पल कॅप धारकांबद्दल जाणून घेऊया.
08:13 PM (IST) Jun 02
आता आधारकार्ड निःशुल्क अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ते अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागतील.
08:06 PM (IST) Jun 02
आयकर खात्याने दिलेल्या तारखा तुम्ही लक्षात ठेवायलाच हव्यात. आज आम्ही जून महिन्यातील या तारखा तुमच्यासाठी घेऊन आलोय.
07:07 PM (IST) Jun 02
इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने ते नुकसानग्रस्त झाले. त्यामुळे वैमानिकाला त्याचे इमरजन्सी लॅन्डींग करावे लागले. या घटनेमुळे एव्हिएशन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. इतर विमाने उडवतानाही आवश्यक सतर्कता बाळगली जात आहे.
06:12 PM (IST) Jun 02
एका थ्री बीएचके फ्लॅटचे भाडे २.७ लाख असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे या शहरातील वाढच्या भाड्याचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.
03:57 PM (IST) Jun 02
हाउसफुल ५ मधील नवीन गाणे 'फुगडी डान्स' मध्ये नाना पाटेकर यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. ७४ व्या वर्षीही त्यांची उर्जा अफाट आहे. संपूर्ण स्टारकास्ट सोबत त्यांचा डान्स पाहण्यासारखा आहे.
03:38 PM (IST) Jun 02
आई होणे आणि करिअर यावर सतत चर्चा होत असते. दीपिका पदुकोणच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. दीपिकाच्या वादावर राधिका आपटे ने काय म्हटले आहे?
03:15 PM (IST) Jun 02
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना पॅलेसिओस यांच्याशी भेट घेतली. यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष पॅलेसिओस यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
03:15 PM (IST) Jun 02
ही आठवण कायम जपून ठेवली आहे... काही आठवणी कधीही विसरता येत नाहीत. आपल्या हृदयात कायम राहतात" असे तिने लिहिले आहे. ही ओळ आईवरील अगाध प्रेम दर्शवते.
02:39 PM (IST) Jun 02
कारेगाव (पुणे) येथील सरपंच निर्मला नवले यांनी अलीकडेच जेजुरीतील खंडोबा मंदिराला भेट दिली. त्यांनी दर्शन घेतल्याचे आणि भंडारा उधळतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत श्रद्धा व्यक्त केली. या फोटोवर लोकांनी उत्स्फूर्त भक्तिभावाने प्रतिक्रिया दिल्या.
02:21 PM (IST) Jun 02
01:54 PM (IST) Jun 02
फिट इंडिया आंदोलन अंतर्गत यंग फिट इंडिया आयकॉन म्हणून शर्वरी वाघ हिची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत शर्वरीला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
12:12 PM (IST) Jun 02
बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक अहवालाने सामाजिक आणि आरोग्यविषयक स्थितीचे भयावह वास्तव उघड केले आहे.
11:57 AM (IST) Jun 02
रायगड किल्ल्यावर उत्खननादरम्यान 'सौम्ययंत्र' किंवा यंत्रराज नावाचे एक प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. हे उपकरण प्राचीन काळात आकाशातील तारे, ग्रहांचे निरीक्षण आणि वेळ मोजण्यासाठी वापरले जात असे.
11:40 AM (IST) Jun 02
अकोल्यात झालेल्या एका भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. याशिवाय अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
11:27 AM (IST) Jun 02
विराट कोहली यांच्या बेंगळुरूतील वन८ कम्यून पबवर धूम्रपानविरोधी कायदा (COTPA, २००३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अचानक तपासणी केली असता तेथे धूम्रपान करण्यासाठी नियुक्त जागा आढळून आली नाही.
10:49 AM (IST) Jun 02
बंगळुरूमधील पंखुरी मिश्रा या तरुणीला ऑटोरिक्षा चालकावर चपलेने मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
09:58 AM (IST) Jun 02
09:28 AM (IST) Jun 02
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत असल्याने तिरुमला येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. एकाच दिवशी जवळपास ९५ हजारांहून अधिक भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले आहे.
09:08 AM (IST) Jun 02
कोलकाता येथील इस्कॉन जगन्नाथ मंदिराच्या रथाची चाके बदलण्याचे २० वर्षांचे प्रयत्न आता फळाला आले आहेत. विशेष म्हणजे, या रथासाठी लाकडी किंवा दगडी चाके वापरण्याऐवजी, बोईंग विमानाचे चाक बसवण्यात आले होते.
08:54 AM (IST) Jun 02
08:45 AM (IST) Jun 02
आलमट्टी धरण केवळ १ मीटर उंचावण्यास कायदेशीर अडचण नसल्यास कोणतीही हरकत नाही. याबाबत कायदेतज्ज्ञांच्या पथकाशी चर्चा केली जाईल, असे मंत्री डॉ. एम. बी. पाटील यांनी सांगितले.
08:39 AM (IST) Jun 02
सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ मध्ये ७१७ धावा करून नॉन ओपनर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. यासह त्याने ९ वर्षांपासून एबी डिव्हिलियर्सच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे.
08:09 AM (IST) Jun 02
08:04 AM (IST) Jun 02
तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराचा जीर्णोद्धारानंतर ८ जून रोजी महाकुंभभिषेक सोहळा होणार आहे. २ जूनपासून कलश पूजेच्या विधींना सुरुवात होईल.
07:52 AM (IST) Jun 02
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की युक्रेनच्या सशस्त्र दलांनी रशियामध्ये केवळ लष्करी लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करून एक "अद्भुत ऑपरेशन" केले आहे.
07:39 AM (IST) Jun 02