शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...
एशियानेट न्यूज पोर्टलवर 27 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
Chanda Mandavkar | Published : Sep 27, 2024 2:48 AM IST / Updated: Sep 27 2024, 02:44 PM IST
निवडणूक आयोगाचे अधिकारी संपूर्ण पथकासह मुंबईत दाखल झाले आहेत. यावरुन उद्धव ठाकरे यांच्या गटातील प्रवक्ते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आनंद दुबे यांनी म्हटले आहे की, राज्यात विधानसभा निवडणुका 28 नोव्हेंबरआधी व्हाव्यात. कारण महाराष्ट्राला एका स्थिर सरकारची गरज आहे.
मुंबईतील मालवणी परिसरात 34 वर्षीय व्यक्तीकडून पत्नीवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पत्नीचे विवाहबाह्यसंबंध असल्याच्या संशयाने पतीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पीडित महिलेला कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबईत पोलिसांनी दिली आहे.
रियासी दहशतवादी हल्ल्याप्रकरणात NIA कडून रियासी आणि राजौरी येथे शोध सुरु आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्हिक्ट्री प्लॅन संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत भेट घेत बातचीत केली आहे.
भारत विरुद्ध बांग्लादेशमध्ये टेस्ट सीरिजअंतर्गत आज सामना उत्तर प्रदेशातील कानपुर येथे खेळवला जाणार आहे. याआधी चाहत्यांकडून भारताच्या विजयासाठी आधीपासून घोषणा केल्या जात आहेत.
रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी छट पूजा आणि दिवाळीनिमित्त विशेष गाड्या सोडणार असल्याची घोषणा केली आहे.