पाहुणं हे काय बरं नव्हं, या गावात ग्रामपंचायत निवडणुकीत होणार 2 सरपंच, दोन निवडणुकांची बातच न्यारी

Published : Nov 26, 2025, 03:00 PM IST
telangna sarpanch

सार

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील काही गावांमध्ये दोन सरपंच आणि दोन स्वतंत्र प्रशासकीय मंडळे आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांना दोनदा मतदान करावे लागते. 

सामान्यपणे प्रत्येक गाव-पंचायतला एकच सरपंच असतो. पण आता परंडोळी किंवा अंतापूर सारख्या काही गावांच्या पंचायतींमध्ये दोन-दोन सरपंच आहेत, म्हणजेच त्या गावांना दोन स्वतंत्र प्रशासकीय मंडळे मिळालेली आहेत. त्यामुळे, त्या गावांमध्ये निवडणुका दोनदा होतात आणि लोकांना दोनवेळा मतदान करावं लागतं. त्यामुळं लोकांची अनेकदा गैरसोय होत असते

दोन राज्यांची सीमा आणि वाद झाला निर्माण

ही विचित्र स्थिती कारण आहे की, या गावांच्या सिमा दोन राज्यांमध्ये येतात. एकीकडे तेलंगणा तर दुसरीकडे महाराष्ट्र असे दोन राज्य आहेत. काही वर्षांपूर्वी, या गावांचा ग्रामस्थांमध्ये प्रश्न निर्माण झाला, ज्यामुळे या गावांच्या पंचायतीनाही विभागले गेले. उदाहरणार्थ, अनेक गावांमध्ये लोक महाराष्ट्र आणि तेलंगणा दोनही पाठींबा देत असतात, म्हणून दोन्ही बाजूस पंचायत व सरपंच नेमण्याचा निर्णय झाल्याचं म्हटलं आहे. यामुळे या गावांमध्ये दुप्पट प्रशासकीय यंत्रणा निर्माण झाली आहे.

स्थानिकांना आणि प्रशासनात समस्या निर्माण

एका गावाला दोन सरपंच असले तरी स्थानिक विकास, जनसुविधा, मतदार कायदे, मतदान प्रक्रियेत गोंधळ निर्माण करू शकतात. लोकांना “माझं मत कुठे द्यायचं?” याची शंका पडू शकते. तसेच, दोन्ही राज्यांतील प्रशासनात समन्वय, निधी वाटप, विकासकामे यामध्ये आव्हाने निर्माण होऊ शकतात. स्थानिक लोकांनी आणि अधिकार्‍यांनी या गुंतागुंतीबाबत स्पष्ट व्याख्या निश्चित करणे गरजेचे आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, जाणून घ्या फायदा
Gold Price : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला; सोन्याच्या दरात एका आठवड्यात चक्क 5 हजारांनी वाढ, वाचा दर