15th May 2025 Live Updates : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज तुक्रिएमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या बैठकीला उपस्थितीत राहणार नाहीयेत. एशियानेट न्यूजवर देश-विदेशातील आजच्या ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी अपडेट्स वाचत रहा.

08:29 PM (IST) May 15
07:42 PM (IST) May 15
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल भारताने तुर्की कंपनी सेलेबी ग्राउंड हँडलिंगची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
07:22 PM (IST) May 15
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या स्टँड अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
06:39 PM (IST) May 15
06:36 PM (IST) May 15
मोदी सरकारने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ७०% जमिनीवरील सेवा हाताळणाऱ्या तुर्कस्तानी ‘सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस’ या कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे.
05:59 PM (IST) May 15
05:53 PM (IST) May 15
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे, की आता पाकिस्तानसोबत केवळ आणि केवळ पीओके आणि दहशतवादावर चर्चा होईल. इतर कोणतेही मुद्दे चर्चेत येणार नाहीत.
05:20 PM (IST) May 15
एमटीडीसीने ९ ते १९ आसन क्षमतेच्या जलविमानांद्वारे मुंबई व पुणे यांना गणपतीपुळे, कोयना धरण, उजनी धरण आणि मांडवा यांसारख्या पर्यटनस्थळांशी जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
04:55 PM (IST) May 15
04:38 PM (IST) May 15
02:28 PM (IST) May 15
राजनाथ सिंह यांचा श्रीनगर दौरा: पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथ सिंह श्रीनगरला पोहोचले. तिथे त्यांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या मोर्टार आणि गोळ्यांचे पुरावे पाहिले.
02:00 PM (IST) May 15
टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्नी नताशासोबत सिद्धिविनायक मंदिरात भेट देत श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
01:32 PM (IST) May 15
मायकेल रुबिन म्हणाले की, भारताने राजनैतिक आणि लष्करी दोन्ही बाजूंनी हे यश मिळवले आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष आता पाकिस्तानच्या दहशतवादी पाठिंब्यावर आहे.
12:19 PM (IST) May 15
कर्नल सोफिया कुरेशींविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरविरुद्धच्या याचिकेवर १६ मे रोजी सुनावणी होणार आहे.
12:09 PM (IST) May 15
पॅन इंडिया स्टार Jr. NTR 'मेड इन इंडिया' या नवीन बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याची बातमी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरली आहे.
11:59 AM (IST) May 15
उन्हाळ्यात लोक आंबे खाण्याचा खूप आनंद घेतात. पण व्यापारी जास्त नफ्यासाठी त्यात केमिकल मिसळतात. तुम्ही विकत घेतलेल्या आंब्यात केमिकल मिसळले आहे का? ते कसे ओळखायचे ते पहा.
11:56 AM (IST) May 15
माधुरी दीक्षित हिचा आज वाढदिवस आहे. ती ५८ वर्षांची झाली असली तरी तिचे सौंदर्य अगदी विशीतील तरुणीला लाजवणारे आहे. बॉलिवूडच्या या सदाहरित दिवाला तिच्या अविस्मरणीय चित्रपटांना पुन्हा एकदा पाहून साजरा करण्यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो?
11:48 AM (IST) May 15
पुण्यातील दत्तवाडी येथील एका व्हिडिओने पुणेकरांची झोप उडाली आहे. यात काही तरुण हातात कोयता नाचवत एका तरुणावर हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेत हा तरुण जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, कोयता गॅंगवर अंकूश आणण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.
11:00 AM (IST) May 15
मुंबईत आज गुरुवारी हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना हाती छत्री ठेवा. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होईल.
10:33 AM (IST) May 15
येत्या 9 जूनपासून विशेष पर्यटन ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
10:23 AM (IST) May 15
उन्हाळ्यात तहान भागवणारे ताडगोळा म्हणजेच आईस अपल अनेक आरोग्यदायी फायदे देते. हे शरीर थंड करण्यासोबतच, पचन सुधारते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. याबद्दलची माहिती येथे आहे.
10:12 AM (IST) May 15
सोने खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. सोन्याच्या दरात ₹५०० ची घसरण झाली आहे. १५ मे रोजी तुमच्या शहरात सोन्याचे दर किती कमी झाले आहेत ते जाणून घ्या...
09:39 AM (IST) May 15
भूल चूक माफ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार: राजकुमार रावच्या 'भूल चूक माफ' चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अंतिम निर्णय झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर नसून प्रथम चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
09:17 AM (IST) May 15
हिंदू विराट सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू मुलींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच त्यांच्या सभेल लॉरेन्स बिष्णोईचे फोटोही झळकले आहे.
08:52 AM (IST) May 15
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय माध्यम आणि प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहे.
08:51 AM (IST) May 15
Mumbai Weather Update : अपेक्षित पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारपर्यंत हलका पाऊस सुरू राहू शकतो.
08:36 AM (IST) May 15
पुणे जिल्ह्यात एका २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. ती नाईट शिफ्टला जात असताना हा प्रकार घडला.
07:49 AM (IST) May 15
११ वर्षीय अनुजची १२ चाकूच्या वारांनी निर्घृण हत्या. डोळे आणि गुप्तांगांवरही हल्ला! आंबा तोडण्याची शिक्षा की जुनी रंजिश? गाव हादरले, आई-मुलींचा आक्रोश आणि पोलिसांच्या ताब्यात अनेक रहस्ये... कातिल सापडेल का?
07:44 AM (IST) May 15
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्या अनेक भागात आज (गुरुवार) सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे. आज दिवसभर हवामान थंड राहण्याची शक्यता आहे. तापमान कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
07:35 AM (IST) May 15
भारतीय हवाई दलाच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले, ज्यामुळे हवाई संरक्षण यंत्रणा कोलमडून पडली आणि भारताच्या लष्करी क्षमतांचे प्रदर्शन झाले.
07:35 AM (IST) May 15
मणिपुरच्या चंदेल जिल्ह्यात बुधवारी आसम रायफल्स आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी कमीत कमी १० दहशतवाद्यांना ठार केले.
07:29 AM (IST) May 15
07:25 AM (IST) May 15
07:20 AM (IST) May 15
जम्मू आणि काश्मीर | अवंतीपोराच्या त्राल भागातील नादेर येथे चकमक सुरू झाली आहे. पोलिस आणि सुरक्षा दल कामावर आहेत. सविस्तर माहिती थोड्याच वेळात समोर येईल.