13th May 2025 Live Updates : 12 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत ऑपरेशन सिंदूरवरुन पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतरही सांबा येथे पाकिस्तानचे संशयास्पद ड्रोन दिसून आल्यानंतर सैन्याने पाडले. अशातच आजची स्थिती आणि आजच्या ताज्या घडामोडींच्या आढावा एशियानेट न्यूज मराठीवर नक्की घ्या….

10:54 PM (IST) May 13
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. पक्षाने राज्यभरातील ५८ शहर जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली असून, पुण्यात घाटे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
10:40 PM (IST) May 13
10:23 PM (IST) May 13
10:02 PM (IST) May 13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करणारे आमदार अतुल भोसले यांची भाजपने सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशस्वी कामगिरी आणि संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
09:46 PM (IST) May 13
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथक, कृत्रिम वाळू धोरण, ITI चं अद्ययावतीकरण, वेतनत्रुटी निवारण, स्मार्ट सिटीमधील घरांची दस्तऐवजीकरण सवलत, न्यायवैद्यकीय विद्यापीठासाठी जागा देणे असे सहा महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
08:44 PM (IST) May 13
कॉकटेल आणि मॉकटेलमध्ये नेमका फरक काय असतो? कोणते हेल्दी असते, कोणते महागडे आणि कोणत्यात अल्कोहोल असते ते जाणून घ्या.
08:37 PM (IST) May 13
पाकिस्तानमधील बलुच लोकांना वेगळा प्रांत हवा आहे. त्यासाठी त्यांचा पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करासोबत रक्तरंजित लढा सुरु आहे. विशेष म्हणजे बलुच मराठा समाजाचा याला पाठिंबा असून आजही त्यांची लढाऊ वृत्ती दिसून येत आहे.
08:17 PM (IST) May 13
08:14 PM (IST) May 13
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी कर्तव्य पथावर झालेल्या तिरंगा शौर्य सम्मान यात्रेत भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका स्पष्ट केली.
07:40 PM (IST) May 13
07:23 PM (IST) May 13
06:46 PM (IST) May 13
मुंबई वाहतूक पोलिस दलातील हवालदार भिकाजी गोसावी यांनी सोमवारी बी. डी. सोमाणी जंक्शन येथे समुद्रात बुडणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली.
06:35 PM (IST) May 13
06:06 PM (IST) May 13
05:18 PM (IST) May 13
१३ ते २४ मे २०२५ पर्यंत चालणाऱ्या ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय सिनेमाच्या गतिमान आणि विकसित होत जाणाऱ्या जगाला प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. रेड कार्पेटवर चालणाऱ्या ६ भारतीय सेलिब्रिटींची ही यादी आहे
05:13 PM (IST) May 13
देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी मान्सून हंगामाची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. यंदा मान्सून वेळेआधीच देशात दाखल होण्याची शक्यता असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
05:02 PM (IST) May 13
PM Narendra Modi: ७४ वर्षांचे असूनही, नरेंद्र मोदी त्यांच्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित करतात. पावसाळ्यात एक वेळ जेवण, कल्पवास आणि नवरात्रीचा उपवास ठेवून ते स्वतःला ऊर्जावान ठेवतात. जाणून घ्या त्यांचे फिटनेस सीक्रेट्स.
04:58 PM (IST) May 13
काळाच्या पलीकडे जाणारे गाउन ते बोल्ड कॉउचर, कान्सने अविस्मरणीय फॅशन क्षण पाहिले आहेत. जगभरातील स्टाईल प्रेमींना प्रेरणा देणाऱ्या आयकॉनिक रेड कार्पेट अपीयरन्सवर एक नजर.
03:59 PM (IST) May 13
Adampur Airbase: पंतप्रधान मोदींनी आदमपुर एअरबेसला भेट देऊन पाकिस्तानच्या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीला नुकसान झाल्याच्या दाव्याला खोटे ठरवले. त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि देशसेवेबद्दल त्यांचे आभार मानले.
03:43 PM (IST) May 13
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने इस्रोच्या उपग्रहांचा वापर करून दहशतवादी तळांवर हल्ले केले. या मोहिमेत आंतरराष्ट्रीय सहकार्याबरोबरच नवीन उपग्रह प्रक्षेपणाची घोषणा आणि खासगी क्षेत्राचा सहभागही महत्त्वाचा ठरला.
03:28 PM (IST) May 13
03:20 PM (IST) May 13
03:09 PM (IST) May 13
02:44 PM (IST) May 13
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा करार झाल्यानंतर काँग्रेसच्या मागण्यांचे समर्थन केले आहे.
02:43 PM (IST) May 13
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असतानाच, महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला स्फोटाच्या धमकीचा एक गुप्त ईमेल प्राप्त झाला आहे.
02:34 PM (IST) May 13
इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला भारतात उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात CKD युनिट स्थापन करण्यासाठी जागेचा शोध सुरू केला आहे.
02:26 PM (IST) May 13
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज जाहीर केलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल हा ९४.१०% एवढा लागला आहे
02:05 PM (IST) May 13
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान शिवसेनेकडून मुंबई विमानतळाला तुर्की कंपनी सेलेबिनाससोबत संबंध तोडण्यासाठी 10 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
02:00 PM (IST) May 13
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC) प्रकल्पामुळे मुंबईतील लोकल प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे मालगाड्या मुख्य मार्गांवरून वळवल्या जातील, ज्यामुळे प्रवासी गाड्यांसाठी अधिक वेळा उपलब्ध होतील.
01:56 PM (IST) May 13
कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील माजी आमदार निर्मलकुमार सुराणा यांचे पुत्र आदित्य सुराणा आणि त्यांच्या पत्नी प्रतिक्षा सुराणा यांनी आज श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला दोन ई-रिक्षा भेट दिल्या
01:45 PM (IST) May 13
शरद पवार भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणात आज आयोगासमोर हजर राहण्याची शक्यता आहे.
01:40 PM (IST) May 13
मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासाठी आजचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला. ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्या आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाच्या सर्व पदांवरून राजीनामा दिला आहे.
01:38 PM (IST) May 13
मुंबई महानगरपालिकेने नालेसफाईच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी AI प्रणालीचा अवलंब केला आहे. या प्रणालीद्वारे ठेकेदारांनी दररोज केलेल्या कामाचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची सक्ती आहे, ज्यामुळे कामाच्या प्रगतीची पडताळणी होते आणि गैरप्रकार उघडकीस येत
01:28 PM (IST) May 13
कंतारा-2 चित्रपटातील अभिनेता राकेश पुजारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते अवघ्या ३३ वर्षांचे होते. ते एक उत्तम विनोदवीर म्हणूनही ओळखले जात होते.
01:24 PM (IST) May 13
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर टर्कीने पाकिस्तानला दिलेल्या खुल्या पाठिभूमीमुळे पुण्यासह देशभरात 'बॅन टर्की' चळवळ जोर धरत आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी टर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकला आहे.
01:16 PM (IST) May 13
प्रसिद्ध वैज्ञानिक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुबन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 10 मे ला कावेरी नदीजवळील साई आश्रम, श्रीरंगपट्टण येथे त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
01:12 PM (IST) May 13
01:11 PM (IST) May 13
उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी आजच्या पावसाने काहीसा दिलासा दिला, मात्र त्याचबरोबर शहरात वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या हालअपेष्टांनाही कारणीभूत ठरला.
12:56 PM (IST) May 13
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित येण्याच्या मुद्द्यावर भाष्य केल्याने चर्चा रंगल्या होत्या. आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत जाण्यास तयार असून पण राज यांनी यावर मौन बाळगले आहे.
12:25 PM (IST) May 13
इंग्रजी माध्यम आणि अन्य शालेय बोर्डाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घडली आहे.