11 ऑक्टोबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...
एशियानेट न्यूज पोर्टलवर 11 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
Chanda Mandavkar | Published : Oct 11, 2024 8:59 AM / Updated: Oct 11 2024, 09:09 AM IST
आरआरएस नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी हरिद्वार कोणत्या जातीशी संबंधित आहे अशा प्रश्न उपस्थितीत केला आहे. याशिवाय देशातील 12 ज्योतिर्लिंगही कोणत्या जातीचे आहेत असा प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारकडून वर्ष 2024-25 साठी संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये 'घर घर संविधान' उपक्रम राबण्याची घोषणा करण्यात आली आहे.
जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त समाजवादीचे प्रमुख अखिलेश यादव गोमती नगरमधील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय सेंटरला भेट देणार आहेत. याआधीच लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ज्युनिअर डॉक्टर्सकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनासंबंधिच पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्रातील पुण्यात अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 30 विद्यार्थी आजारी पडल्याचे प्रकरण समोर आले आहे.