सचिन पिळगावकर यांचा शोलेमधला सीन का हटवला, कारण ऐकून व्हाल चकित

Published : Aug 15, 2025, 06:20 PM IST
sachin pilgaonkar

सार

शोले चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी रहीम चाच्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी चित्रपटातील त्यांचा एक खास सीन, ज्यात गब्बर त्यांना मारतो, तो काढून टाकला होता. सचिन पिळगावकर यांनी याबाबतचा किस्सा सांगितला आहे.

बॉलिवूडमध्ये शोले हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. या सिनेमाला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता सचिन पिळगावकर यांनी रहीम चाच्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती, ज्याबद्दल त्यांनी एक खास किस्सा सांगितला आहे. सचिन पिळगावकर यांनी बोलताना म्हटलं आहे की, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी चित्रपटातील त्यांचा एक खास सीन काढून टाकला होता आणि त्यामागील काही कारणेही सांगितली होती.

कोणता सिन हटवला? 

सचिन यांनी म्हटलं आहे की, “मला मारण्याचा जो सीन होता, तो गब्बरच्या अड्ड्यावर शूट झाला होता, पण रमेशजींनी काही कारणांमुळे तो सीन एडिटिंगमध्ये काढून टाकला. पहिले कारण चित्रपट हा खूप लांबला होता, त्यामुळं तो सिन काढून टाकला. दुसरे कारण असे की, रमेशजींना वाटले की 16-17 वर्षांच्या मुलाची हत्या होताना दाखवणे थोडे विचित्र वाटेल.

त्यांना खूप वाईट वाटलं

मग शेवटच्या सीनमध्ये गब्बरच्या हातावर एक काळी मुंगी चालताना दाखवली आहे. ती पाहून गब्बर म्हणतो, “रामगडचा मुलगा आला आहे,” आणि ती मुंगी चिरडून टाकतो. त्यानंतर गावात माझा मृतदेह घोड्यावरुन आलेला दाखवला जातो, ज्यातून स्पष्ट होते की मला गब्बरने ठार मारलं आहे. हा सीन काढल्यामुळं त्यांचा खूप वाईट वाटलं.

"त्या वेळी मला खूप वाईट वाटलं, कारण माझा गब्बरसोबतचा एक खास सीन होता आणि तो काढून टाकला गेला. प्रत्येक अभिनेत्याला तसं वाटेल. पण आज, जेव्हा मी स्वतः दिग्दर्शक आहे, तेव्हा मला जाणवतं की रमेशजींनी जे केलं ते योग्य होतं.” त्यांनी रमेश सिप्पींच्या निर्णयाचा सन्मान करतात. गब्बरकडून शोलेमध्ये सचिन यांना मारलं होतं. दरम्यान, रमेश सिप्पी यांच्या शोले या सिनेमाला आता 50 वर्षे पूर्ण झाले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?