
दिल्लीतील कुत्र्यांचा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमामानावर गाजत आहे. अनेक सेलिब्रेटींनी याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यासंदर्भात एक आदेश दिला आहे. या ठिकाणी अक्षरशः हजारो कुत्र्यांचा मोठा उपद्रव आहे. दिल्लीकरांची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या या भटक्या कुत्र्यांनाआश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
अनेक सेलिब्रिटींनी कोर्टाचा हा आदेश योग्य नसल्याचं म्हटलंय. तर गायक राहुल वैद्य यानं कोर्टाच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानं आपला अनुभव शेअर केला आहे. राहुलने म्हटलं की, मी माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करतो! मला कुत्रा हा प्राणी आवडतो, पण गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, 'फिरणारे कुत्रे समाजाची निष्काळजीपणा दर्शवतात, करुणा नाही'.
राहुलनं सोशल मीडियावर दिखावा करणाऱ्यांपेक्षा प्रामाणिकपणे मदत करण्याचं आवाहन केलं आहे. जर इतकाच भटक्या कुत्र्यांवर तुमचा जीव असेल, तर कृपयाकरून त्यांना तुमच्या घरी घेऊन जा! केवळ सोशल मीडियावर मोठ्या स्टोरीज टाकून आणि न्यायालयाच्या निर्णयावर टीका करून मीडियानं निर्माण केलेल्या वादात भर घालू नका. या निर्णयाचा प्राणी प्रेम किंवा करुणेच चा या मुद्द्याशी काहीही संबंध नाहीये.
राहुल म्हणतो की, "माझा शेवटचा प्रश्न: जर तुमच्या आई-वडिलांना किंवा मुलांना भटक्या कुत्र्यानं चावा घेतला तर तुमचा दृष्टिकोन असाच राहील का? राहुलचा एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुत्र्याचा चावा घेतला आहे. सोबत त्यानं जखमेचा फोटो टाकला आहे. अभिनेत्याचं नाव उघड न करता, राहुलनं स्पष्ट केलं की, मुद्दा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांबद्दल आहे.