Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?

Published : Oct 06, 2026, 01:54 PM IST
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?

सार

एका मुलाखतीत विजय देवरकोंडाला त्याच्या जुन्या फोनबद्दल विचारण्यात आलं. विराट कोहलीसारखे मोठे स्टार्सही नवा आयफोन घेण्याऐवजी जुनाच फोन वापरतात, असा संदर्भ देत त्याला हा प्रश्न विचारला गेला होता.

मुंबई : आजकाल स्मार्टफोन फक्त बोलण्यासाठी उरलेला नाही. अनेकांसाठी आयफोन म्हणजे एक 'स्टेटस सिम्बॉल' झालाय. बाजारात नवा मॉडेल आला रे आला, की सोशल मीडियावर हवा करण्यासाठी लोक तो विकत घ्यायला धावतात. आर्थिक परिस्थिती नसतानाही अनेक तरुण महागडे फोन घेण्यासाठी मोठमोठे कर्ज (EMI) काढतात. याच आयफोनच्या वेडावर अभिनेता विजय देवरकोंडाने नुकतंच एक अतिशय साधं आणि प्रॅक्टिकल उत्तर दिलंय, जे सध्या सगळ्यांची मनं जिंकत आहे.

जुन्या फोनवरून विजय देवरकोंडाला विचारला गेला भन्नाट प्रश्न

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत एका पत्रकाराने विजय देवरकोंडाला त्याच्या स्मार्टफोन वापरण्याच्या सवयींवरून एक मस्त प्रश्न विचारला. विराट कोहलीसारखे टॉपचे सेलिब्रिटीसुद्धा नवीन मॉडेल घेण्याऐवजी आपला जुनाच आयफोन कसा वापरतात, याचा संदर्भ या पत्रकाराने दिला. त्यानंतर त्याने विजयला थेट विचारलं की, तू एवढे पैसे कमावतोस, तुला नवा फोन घेणं सहज शक्य आहे, तरीही तू नवा फोन का घेत नाहीस?

या प्रश्नावर विजयने अगदी स्पष्ट उत्तर दिलं. तो म्हणाला की त्याचा सध्याचा फोन एकदम व्यवस्थित चालतोय. जेव्हा जुना फोन सगळी कामं चोख करतोय, तेव्हा उगाच नवीन डिव्हाइस कशाला घ्यायचं, असा सवाल त्याने केला. त्याच्या या बोलण्यातून त्याचा प्रॅक्टिकल विचार दिसून आला. केवळ खिशात पैसे आहेत म्हणून गरज नसताना वस्तू विकत घेण्यापेक्षा, जोपर्यंत एखादी वस्तू चालतेय तोपर्यंत ती वापरली पाहिजे, असं त्याचं स्पष्ट मत आहे.

सेलिब्रिटींच्या लाइफस्टाईलमागचं लपलेलं सत्य

या गप्पांदरम्यान विजयने सेलिब्रिटींच्या लाइफस्टाईलबाबत आणखी एक रंजक गोष्ट सांगितली. तो म्हणाला की, मोठ्या अभिनेत्यांना आणि स्टार्सना अनेक ब्रँड्सकडून फोन, गॅजेट्स आणि इतर महागड्या वस्तू फुकट गिफ्ट म्हणून मिळतात. त्यामुळे सेलिब्रिटी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कष्टाच्या पैशाने विकत घेतात, असा गैरसमज चाहत्यांनी करून घेऊ नये, असं त्याने स्पष्ट केलं.

फक्त दिखावा करण्यासाठी महागडे आयफोन घेण्याच्या मानसिकतेवरही विजयने आपलं स्पष्ट मत मांडलं. तो म्हणाला की, घरातले साधे खर्च भागवताना नाकीनऊ येत असताना, केवळ 'स्टेटस'साठी कर्ज काढून महागडा फोन घेणं हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे.

सोशल मीडियावरील खोट्या स्टेटसपेक्षा खऱ्या गरजा खूप महत्त्वाच्या असतात. विजय देवरकोंडाने हे साधं सत्य मांडलं असून, त्याच्या या बोलण्यामुळे आता अनेक जण आपल्या आयफोनच्या वेडावर नव्याने विचार करत आहेत. या अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना एक स्पष्ट संदेश दिलाय. कष्टाचे पैसे खर्च करण्यापूर्वी 'खरंच आपल्याला नवीन फोनची गरज आहे का?' हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा, अशी त्याची इच्छा आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Trisha Vitamin D : वयाच्या 40शी नंतर अभिनेत्री त्रिशा असं का करतेय? जाणून घ्या व्हिटॅमिन डीचं महत्त्व
Goa Celebrity Homes : गोव्यात अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटींचे आहेत आलिशान बंगले! पाहा हे खास फोटो