Vidyut Jammwal Hollywood Debut : विद्युत जामवालची हॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'स्ट्रीट फायटर'मध्ये साकारणार भूमिका

Published : Oct 05, 2026, 06:22 PM IST
Vidyut Jammwal Hollywood Debut : विद्युत जामवालची हॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'स्ट्रीट फायटर'मध्ये साकारणार भूमिका

सार

बॉलिवूडचा ॲक्शन हिरो विद्युत जामवाल आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'स्ट्रीट फायटर' या ॲक्शन सिनेमात तो 'धलसिम' ही लोकप्रिय गेमिंग व्यक्तिरेखा साकारणार आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल आता हॉलिवूडमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी 'स्ट्रीट फायटर' या ॲक्शन सिनेमातून तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात तो 'धलसिम' ही लोकप्रिय गेमिंग व्यक्तिरेखा साकारणार आहे. नुकतंच मुंबईत पॅरामाउंट पिक्चर्स इंडियाने एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तिथे विद्युतने आपल्या भूमिकेबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच कार्यक्रमात सिनेमातील त्याचा एक खास व्हिडिओ (फीचरेट) सुद्धा दाखवण्यात आला.

एका प्रसिद्धीपत्रकानुसार, विद्युतने या सिनेमापर्यंतचा आपला प्रवास उलगडला. मार्शल आर्ट्ससोबत असलेल्या जुन्या नात्यामुळे त्याला या भूमिकेशी कसं जोडता आलं, हे त्याने सांगितलं. तो म्हणाला की, वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून तो कलारीपयट्टूचं प्रशिक्षण घेत आहे. याच वर्षानुवर्षांच्या सरावामुळे 'धलसिम'ची भूमिका जणू काही माझ्यासाठीच बनली आहे, असं त्याला वाटतं. या सिनेमात त्याची निवड कशी झाली आणि इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, यावरही त्याने प्रकाश टाकला.

'स्ट्रीट फायटर'बद्दल थोडंसं

किताओ साकुराई यांनी दिग्दर्शित केलेला 'स्ट्रीट फायटर' हा सिनेमा एका लोकप्रिय व्हिडिओ गेम फ्रँचायझीवर आधारित आहे. या सिनेमात नोहा सेंटिनेओ 'केन मास्टर्स'च्या भूमिकेत, अँड्र्यू कोजी 'रियू'च्या भूमिकेत तर जेसन मोमोआ 'ब्लांका'च्या भूमिकेत दिसणार आहेत.

सिनेमाची अधिकृत कथा

एका निवेदनानुसार सिनेमाची कथा अशी आहे: "१९९३ च्या काळात घडणारी ही गोष्ट आहे. एकमेकांपासून दुरावलेले स्ट्रीट फायटर्स रियू (अँड्र्यू कोजी) आणि केन मास्टर्स (नोहा सेंटिनेओ) पुन्हा एकदा लढाईच्या मैदानात उतरतात. रहस्यमयी चुन-ली (कॅलिना लियांग) त्यांना पुढच्या 'वर्ल्ड वॉरियर टूर्नामेंट'साठी निवडते. ही स्पर्धा म्हणजे मुठी, नशीब आणि संतापाचा एक भयंकर संघर्ष असतो. पण या महायुद्धामागे एक भयंकर कट शिजत असतो, ज्यामुळे त्यांना एकमेकांसमोर आणि स्वतःच्या भूतकाळातील चुकांसमोर उभं राहावं लागतं. जर त्यांनी असं केलं नाही, तर सगळा खेळ खल्लास (GAME OVER)!"

इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा: पॅरामाउंट पिक्चर्स इंडियाने (@paramountpicsin) शेअर केलेली पोस्ट

सिनेमातील इतर तगडी स्टारकास्ट

या सिनेमात कॅलिना लियांग, जो अनोई, डेव्हिड दस्तमालचियन, कोडी रोड्स, अँड्र्यू शुल्झ, एरिक आंद्रे, ऑर्विल पेक, ऑलिव्हियर रिचटर्स, हिरूकी गोटो, रेना वल्लांडिंगहॅम, अलेक्झांडर व्होल्कानोव्स्की आणि कर्टिस '५० सेंट' जॅक्सन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

भारतात कधी होणार रिलीज?

या वर्षाच्या सुरुवातीलाच 'स्ट्रीट फायटर'चा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये सिनेमातील मुख्य कलाकारांची ओळख करून देण्यात आली होती. हा सिनेमा भारतात १६ ऑक्टोबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या सिनेमाची रविवारी बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, ३ दिवसांत १५० कोटी पार
Srinidhi Shetty: KGF फेम अभिनेत्री आणि 'रंगितरंगा'चा हिरो एकत्र, काय आहे या साय-फाय थ्रिलरचं रहस्य?