अभिनेत्री हुमा कुरेशीने तिचा भाऊ, अभिनेता साकिब सलीमसोबत मिळून एक निर्मिती संस्था सुरू केली आहे. तिने बॉलिवूडने दाक्षिणात्य सिनेमांकडून त्यांच्या स्थानिक मुळांशी जोडलेले राहण्याचे शिकावे, असे मत व्यक्त केले.
'या' अभिनेत्रीला मोठ्या बजेटचे सिनेमे कधीही भेटत नाहीत, कारण ऐकून म्हणाल आपलं कामचं बरं
अभिनेत्री हुमा कुरेशी ही माध्यमांमध्ये कायमच चर्चेत राहत असते. तिच्यावर लग्नाचा समाजातून दबाव वाढत असल्याचं तिने बोलताना अनेकवेळा सांगितल आहे. तिने आता नवीन सिरीजमध्ये काम केल्याबद्दल वक्तव्य केलं.
25
निर्मितीला केली सुरुवात
मनोरंजन क्षेत्रात लवकर संधी मिळत नाही, मला अनेकदा वाट पाहावी लागल्याचं यावेळी हुमाने बोलताना म्हटलं. तिने अनेकदा मला मोठे सिनेमे भेटत नसल्याचं सांगून जे भेटतात त्यामध्ये मी षटकार मारत असल्याची कबुली दिली.
35
सिनेमा ट्रेंडवर आधारित असू नये
आता सिनेमे हे ट्रेंडवर आधारित असू नये असं हुमा कुरेशीने बोलताना म्हटलं आहे. एखादा शो बनवल्यावर त्याच्यावर आधारित दुसरे शो बनवले जातात पण ते यशस्वी होतीलच याची शाश्वती असेलच असं नाही.
दाक्षिणात्य सिनेमाकडून बॉलिवूड मधील लोकांनी काय शिकायला हवं?
दाक्षिणात्य सिनेमे हे त्यांच्या रूटशी कनेक्टेड आहेत, त्यांनी त्यांच्या सिनेमांमध्ये त्यांच्या स्थानिक गोष्टींना कायमच प्राधान्य दिलं आहे. आपण पाश्चिमात्य गोष्टी सिनेमांमद्ये वापरतो पण आपल्या लोकांना काय आवडेल याचा विचार करत नाही.
55
निंर्मिती संस्था कोणासोबत सुरु केली?
हुमा कुरेशीने भाऊ अभिनेता साकिब सलीम आणि मी मिळून निर्मिती संस्था सुरू केलीय. आम्ही सिनेमे बनवत राहू आणि प्रत्येक सिनेमातून काहीतरी शिकत राहू. त्या दोघांच्या या संस्थेतून नवीन आशयाचे चित्रपट बनवले जाणार आहेत.