बॉलिवूड अभिनेता आहान शेट्टी आणि 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकर यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जियाने अनेकदा तिचा बॉयफ्रेंड असल्याचं कबूल केलं असलं तरी, त्याचं नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे.
सुनील शेट्टीची 'हि' अभिनेत्री होणार सून, आहान शेट्टी डेट करत असलेली मुलगी पाहून काढाल दृष्ट
बॉलिवूड सुपरस्टार आहान शेट्टीच्या अफेअरची चर्चा काही दिवसांपासून सुरु झाली आहे. आहान एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं दिसून आलं आहे. त्याबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्यात.
26
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून?
मराठी अभिनेत्री सुनील शेट्टीची सून होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अहान शेट्टीचं नाव 'वेड' सिनेमातील जिया शंकरसोबत जोडलं जातंय. जिया आणि अहान हे दोघे रिलेशिनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
36
जियाने अनेकदा बॉयफ्रेंड असल्याची दिली कबुली
जियाने आतपर्यंत अनेकदा तिचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं आहे. पण तो नेमका कोण? याबद्दल तिनं काहीच सांगितलेलं नाही. अभिनेत्री जिया शंकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते आणि तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.
अभिनेत्री जिया शंकर कायम व्हेकेशन साजर करत असते. अनेकदा ती तिच्या बॉयफ्रेंडचा उल्लेख करत असते, त्याबाबत अनेकदा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे या चर्चा खऱ्या की खोट्या हे अहान किंवा जियाने कबुली दिल्याशिवाय स्पष्ट होणार नाही.
56
आहान शेट्टी काय काम करतो?
अहान शेट्टीच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं २०२१ मध्ये साजिद नाडियादवालाच्या 'तडप' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमामध्ये तारा सुतारिया मुख्य भूमिकेत होती. पण, पदार्पणातच अहानचा सिनेमा फ्लॉप ठरला.
66
जिया शंकरने काय काम केलं?
जिया शंकरच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं 'वेड' सिनेमातजिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिका साकारलेली. त्याचबरोबर तिनं, 'पिशाचीनी', 'काटेलाल अँड सन्स' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.