प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने तिचा पती रॉकी जयस्वाल याच्यासमोरच एका शोमध्ये अभिनेता अभिषेकला किस केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यावर हिनाचा पती रॉकीने दिलेली प्रतिक्रिया आणि त्याने केलेली 'एक्सचेंज ऑफर'ची मागणी चर्चेत आली आहे.
अभिनेत्री हिना खान हि कायमच चर्चेत येत असते. ती तिच्या खाजगी आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे कायम माध्यमांमध्ये झळकत असते. तिला काही दिवसांपूर्वी कॅन्सर झाला होता, त्यावरून ती चर्चेत आली.
26
माध्यमांमध्ये कायमच चर्चेचा चेहरा
टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा हिना खान आहे. हिनाने फक्त मालिकाच नाही तर काही चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बॉसमध्ये अभिनेत्री धमाका करताना दिसली.
36
पतीचे लक्ष नसताना दुसऱ्या अभिनेत्याला केलं किस
पतीचे लक्ष नसताना हिना खानने दुसऱ्या अभिनेत्याला किस केलं. पतीचे लक्ष नसताना अभिनेत्रीने चक्क दुसऱ्या अभिनेत्याला किस केले. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
शोमध्ये अभिनेता अभिषेक हिना खानकडे बघून म्हणतो की, कदाचित तुम्हाला मी अजिबात आवडत नाही. अभिषेकचे बोलणे ऐकून हिना खान मागे वळते आणि चक्क अभिषेकला किस करते. हिना खानने किस घेतल्यानंतर अभिषेक लाजताना दिसतोय.
56
नवरा रॉकीचा चेहरा सांगून जातो बरंच काही
त्यानंतर हिना खानचा पती रॉकी जयस्वाल याला कळते की, अभिषेकला हिनाने किस दिलीये. यादरम्यान रॉकीचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसतोय.
66
सगळ्यांसमोर केलं किस
यानंतर अभिषेक रॉकीला बोलतो की, मला खरोखरच माफ कर… हे सर्वकाही तुझ्यासमोर झाले. यानंतर रॉकी शांत न बसता थेट म्हणतो की, एक्सचेंज ऑफर आहे..तिने तुला किस केले… मी आता तुझ्या गर्लफ्रेंडला किस करतो बघ…