अभिनेत्री कतरीना कैफ गरोदर असताना तिचे काही खाजगी फोटो लीक झाले आहेत, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तीव्र नाराजी व्यक्त करत फोटो काढणाऱ्यांना गुन्हेगार म्हटले आहे.
तुम्ही लोक गुन्हेगारचं, सोनाक्षी सिन्हाचा चढलेला पारा पाहून आठवेल थर्ड डिग्री मार
बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस जगत आहेत. ते दोघे लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार असून ती त्यांच्यासाठी महत्वपूर्ण घटना राहणार आहे.
26
कतरिनाचे काही खाजगी फोटो झाले लीक
कतरीनाचे यावेळी काही खाजगी फोटो लीक करण्यात आले आहेत. ती यावेळी काही वैयक्तिक क्षण साजरे करत असून यावेळीच तिचे फोटो काढण्यात आले आहेत.
36
सोनाक्षी सिन्हा भडकली
सोनाक्षी सिन्हा यावेळी फोटो व्हायरल केलेल्या नेटकऱ्यांवर भडकल्याचं दिसून आलं आहे. तिने अतिशय कडक शब्दांमध्ये फोटो काढणाऱ्यांचा पान उतारा केला आहे.
"तुम्हाला काय झालं आहे? एका महिलेचे तिच्याच घरात संमतीशिवाय फोटो काढून ते सार्वजनिक व्यासपीठावर टाकणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही लोक गुन्हेगारांपेक्षा काही वेगळे नाही!" असं सोनाक्षीने यावेळी म्हटलं आहे.
56
आलिया भटने केली होती नाराजी व्यक्त
मागे काही दिवसांपूर्वी आलिया भटने नाराजी व्यक्त केली होती. आलिया भटच्या घराचे काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांनी फोटो व्हायरल करण्यात आले होते, त्यावरून तिने त्यांच्यावर टीका केली होती.
66
कतरीना आणि विकीने दिली नाही प्रतिक्रिया
यावर कतरीना किंवा विकी यांच्यापैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच कतरिनाने सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्या वेळी तिने पती विकीसह एक सुंदर फोटो शेअर केला होता, ज्यात विकी कतरिनाच्या बेबी बंपकडे प्रेमाने पाहताना दिसत होता.