शिल्पा शेट्टीच्या हॉटेलमध्ये 'या' भाजप नेत्यानं कमवला खोऱ्यानं पैसा, नाव ऐकून म्हणाल हे कसं झालं?

Published : Nov 08, 2025, 11:31 AM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटींच्या फसवणुकीचे आरोप असून त्यांना देश सोडण्यास मनाई आहे. आता शिल्पाच्या हॉटेल व्यवसायात भाजपाचे आमदार प्रसाद लाड हे ३३.३३ टक्के हिस्सेदारीसह पार्टनर असल्याची माहिती समोर आली आहे. 

PREV
15
शिल्पा शेट्टीच्या हॉटेलमध्ये 'या' भाजप नेत्यानं गुंतवला खोऱ्यानं पैसा, नाव ऐकून म्हणाल हे कसं झालं?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही मागील काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टीसह तिचा पती राज कुंद्रा याच्यावर तब्बल 60 कोटींच्या फसवणुकीचे आरोप आहेत.

25
त्यांना देश सोडायला केली मनाई

दोघांना म्हणजेच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांना देश सोडायला बंदी घातली आहे. कोर्टाने दोघांना विदेशात जायचे असेल तर ६० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

35
शिल्पा शेट्टीसोबत भाजपा नेता झाला पार्टनर

शिल्पा शेट्टीसोबत भाजपा नेता पार्टनर असल्याची माहिती देण्यात आली आहे. तिच्या हॉटेलमध्ये या नेत्याचे जवळपास ३३.३३ टक्के हिस्सेदारी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

45
कोण आहे हा नेता?

हा नेता दुसरा तिसरा कोण नसून भाजपाचे आमदार प्रसाद लाड हे आहेत. ते शिल्पा शेट्टीला बिझनेसमध्ये पार्टनर आहेत. याबद्दल स्वत: प्रसाद लाड यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना माहिती दिली.

55
काय म्हटले प्रसाद लाड?

प्रसाद लाड यांनी यावेळी बोलताना या पार्टनरशिपबद्दल माहिती दिली आहे. रेस्टॉरंटचा आमचा फार मोठा बिझनेस आहे आणि माझ्या मुलाची ती आवड आहे, बॅस्टियनबद्दल तुम्ही ऐकलेच असेल त्यामध्ये शिल्पा शेट्टी, रणजीत बिंद्रा हे आमचे पार्टनर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. मागील काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचे हे रेस्टॉरंट प्रचंड चर्चेत आहे.

Read more Photos on

Recommended Stories