मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीय, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ

Published : Oct 30, 2025, 09:45 AM IST

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे, ज्यात त्यांनी स्वतःला गुजरातीपेक्षा जास्त महाराष्ट्रीयन म्हटले आहे. मुंबई हीच आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचे सांगतल आहे.

PREV
16
मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीय, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ

जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर दुःख झालं. सतीश शाह यांनी गाजलेल्या अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

26
साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतून सतीश शाह याना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. सतिश शाह यांच्या निधनानंतर त्यांची जुनी मुलाखत व्हायरल होतेय. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुंबईचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर 'मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीयन आहे' असंही ते म्हणाले होते.

36
जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ केला शेअर

जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मकरंद अनासपुरे हा सतीश यांना प्रश्न विचारतात की तुमची बायको मराठी आहे तर तुम्हाला चांगली मराठी येते का असा प्रश्न विचारला होता.

46
सतीश शाह काय म्हणाले?

यावेळी बोलताना सतीश शाह यांनी म्हटलं आहे की, 'नाही नाही! माझा जन्म इथेच झाला. आम्ही रस्त्यावर क्रिकेट खेळायचो, सुनील गावस्कर, रेगे आणि इतर पण, आम्ही सगळे लहानपणी. तर आजूबाजूला सगळे महाराष्ट्रीयन आणि पारसीच होते. तर त्यामुळे मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीय आहे.'

56
मुंबई विषयी सतीश काय म्हणाले?

मुंबई विषयी बोलताना सतीश यांनी म्हटलं आहे की, 'माझ्यामध्ये जे काही कला आहे, त्यामध्ये मुंबईचा जास्त वाटा आहे. मुंबईमध्ये मी लोकांना ओळखायला शिकलो. रस्त्यावर डबा ऐस-पैस, लगोरी, क्रिकेट वैगरे खेळून आत्मविश्वास आला मला.

66
मुंबई विषयी सतीश काय म्हणाले?

मुंबई ही आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचं त्यानं म्हटलं आहे. अनेक लोकांना भेटलो आणि त्यांच्यासोबत ओळखी झाल्यानंतर मी हे सगळं करू शकलो. त्यामुळे मी हे मुंबईचे आभार मानतो.

Read more Photos on

Recommended Stories