सैयारा, मालिक, आंखों की गुस्ताखियाँ आणि कुली हे चित्रपट या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. सैयारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर, तर मालिक, आंखों की गुस्ताखियाँ आणि कुली हे चित्रपट अनुक्रमे अमेझॉन प्राईम आणि झी ५ वर प्रदर्शित होतील.
Movie & Webseries On OTT: सप्टेंबर महिन्यात कोणते चित्रपट आणि वेबसिरीज येणार?
सध्या ओटिटीचा जमाना असल्यामुळं दर आठवड्याला चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यात वेबसिरीज आणि चित्रपट मोठ्या प्रमाणावर रिलीज केले जाणार आहेत. आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
25
सैयारा
मोहित सुरीने दिग्दर्शित केलेला सैयारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला. या चित्रपटातून अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होत. २०२५ मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येणार आहे.
35
मालिक
मालिक चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकितने केलं असून कुमार तौरानी आणि जय शेवक्रमनी हे त्याचे निर्माते आहेत. या अॅक्शन थ्रिलरमध्ये राजकुमार राव, प्रोसेनजीत चॅटर्जी आणि मानुषी छिल्लर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगली कामगिरी केली नसून ५ सप्टेंबरला तो अमेझॉन प्राईमवर येणार आहे.
45
आंखों की गुस्ताखियाँ
आंखों की गुस्ताखियाँ या रोमँटिक ड्रामा चित्रपटामध्ये विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूर यांनी काम केलं. संजय कपूरची मुलगी शनाया हिने या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ५ सप्टेंबरपासून हा चित्रपट झी ५ वर पाहता येणार आहे.
55
कुली
कुली चित्रपटात प्रमुखउ भूमिकेत रजनीकांत असून या चित्रपटाला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. यामध्ये नागार्जुन, श्रुती हासन, सौबिन शाहिर, सत्यराज, उपेंद्र आणि रचिता राम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमीर खान आणि पूजा हेगडे यांनी प्रेक्षक कलाकारांची भूमिका या चित्रपटात केली आहे. ११ सप्टेंबर रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर येणार आहे.