मंगळवारी, 'परम सुंदरी'ने ४.२५ कोटींची कमाई केली असून एकूण कमाई ३५ कोटींवर पोहोचली आहे. 'वार २'ने ६५ लाख कमावले असून एकूण कमाई २३५.५५ कोटींवर पोहोचली आहे. 'कुली'ने १.१० कोटी कमावले असून एकूण कमाई २८० कोटींवर पोहोचली आहे.
Box Office Collection 3th September: मंगळवारी गाजत असलेल्या 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
या शुक्रवारी परम सुंदरी नावाचा चित्रपट रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर तो चांगला चालला आहे. कुली, वार २ आणि महाअवतार नरसिम्हा या चित्रपटांनी चांगला गल्ला जमवला आहे.
25
परम सुंदरी
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा परम सुंदरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या चित्रपटाने काल ४.२५ कोटींची कमाई केली असून आतापर्यंत ३५ कोटींचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला आहे.
35
War 2
वार २ हा चित्रपट अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर सुरु आहे. या चित्रपटाने काल ६५ लाखांची कमाई केली असून एकूण २३५.५५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
45
कुली
रजनीकांतचा कुली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आहे. या चित्रपटाने काल १.१० कोटींचा गल्ला जमवला आहे. कुली चित्रपटाने एकूण २८० कोटींचा बॉक्स ऑफिसवर भारतात गल्ला मिळवला आहे.
55
महाअवतार नरसिम्हा
महाअवतार नरसिम्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आहे. या चित्रपटाने २४१ कोटींची एकूण कमाई केली असून त्यानं चांगला प्रेक्षकवर्ग मिळवला आहे.