कतरीना कैफच्या ब्युटी ब्रँडचा टर्नओव्हर किती, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Published : Jul 16, 2026, 08:22 PM IST
katrina kaif

सार

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आता एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जात आहे. २०१९ मध्ये लॉन्च झालेल्या तिच्या 'काय ब्युटी' या ब्रँडने अल्पावधीतच प्रचंड यश मिळवले असून, तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. या ब्रँडमुळे कतरिनाची मार्केट व्हॅल्यू वाढली असून तिला मोठे बक्षीसही मिळाले आहे.

बॉलिवूडचे अभिनेते आणि अभिनेत्री अभिनयासोबत बिझनेस करत असतात. यामध्ये खासकरून कतरिना कैफ हीचा उल्लेख करावा लागेल. तीच आता जगभरात नाव झालं आहे. त्याची ब्युटी ब्रँड काय ब्युटी असं नाव आहे. आता कतरीना कैफ एक यशस्वी उद्योजिका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिला याबद्दल मोठे बक्षीस देण्यात आले आहे.

कतरीनाने २०१९ मध्ये लॉन्च केला नवीन ब्रँड 

कतरिनाने २०१९ मध्ये ब्युटी ब्रँड लॉन्च केला. तिच्या कंपनीने मोठ्या ब्रँडला टक्कर दिल्याचं दिसून आलं आहे. वर्ष २०२६ मध्ये तिच्या बिझनेसने ३५० कोटींचा टर्नओव्हर केला आहे. तिच्या ब्रॅंडने एका वर्षात ४६% वाढ झाली आहे. तिचा हा ब्रँड भारतात नाही तर ब्रिटनमध्ये जाऊन पोहचला आहे. तिच्या ब्रँडचा समावेश मिडिल ईस्टमध्ये उपस्थिती दर्शवली आहे.

ब्रँडच्या लिपस्टिकची किती आहे किंमत? 

या ब्रँडच्या लिप्स्टिकची किंमत हि ५०० ते १००० रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळं ते खरेदी करणं अगदी सोपं झालं आहे. या ब्रॅंडमुळे कतरिनाची मार्केट व्हॅल्यू वाढली आहे. कोविडच्या काळात या ब्रँडची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या ब्रँडचा कारभार वाढला आहे. आता कतरीनाचा ब्रँड वाढत चालला असून बिझनेस वुमन म्हणून ओळख तयार झाली.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Rajinikanth Charity Promise: 'कुटुंबाला एक पैसाही देणार नाही', हॉटेलच्या चर्चेदरम्यान रजनीकांत यांचा जुना व्हिडिओ व्हायरल
Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, बिश्नोई गँगची सलमान खानच्या मित्रांना धमकी