Aamir Khan Wedding : आमिरचं तिसरं लग्न, दोन्ही एक्स-बायका गैरहजर, अखेर कारण समोर!

Published : Jul 16, 2026, 04:11 PM IST
Aamir Khan Wedding : आमिरचं तिसरं लग्न, दोन्ही एक्स-बायका गैरहजर, अखेर कारण समोर!

सार

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने तिसरं लग्न केलं आहे. पण या लग्नाला त्याच्या दोन्ही माजी पत्नी, किरण राव आणि रीना दत्ता, गैरहजर होत्या. त्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली होती. आता आमिरच्या एका जवळच्या मित्राने त्या दोघी लग्नाला का नव्हत्या, यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने (Aamir Khan) त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत (Gauri Spratt) ५ जुलै रोजी लग्नगाठ बांधली. मुंबईतील त्याच्या घरी अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हे रजिस्टर मॅरेज (Registered Marriage) पार पडलं. या लग्नाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा आमिरच्या दोन्ही माजी पत्नी, रीना दत्ता (Reena Dutta) आणि किरण राव (Kiran Rao) यांच्या गैरहजेरीची झाली. त्या दोघी लग्नाला का आल्या नाहीत, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर, आमिरचा जवळचा मित्र आणि अभिनेता अमीन हाजी (Amin Hajee) याने यामागचं खरं कारण उघड केलं आहे.

एका मीडिया मुलाखतीत बोलताना अमीन हाजी म्हणाला, "लग्नाच्या वेळी किरण राव यूकेमध्ये (UK) होती. पण तिचा मुलगा आझाद मात्र लग्नाला हजर होता." पहिल्या पत्नीच्या, रीना दत्ताच्या, अनुपस्थितीबद्दल बोलताना तो म्हणाला, "कधीकधी एकमेकांपासून दूर राहणं आणि त्यांना त्यांची स्पेस (Space) देणं, हे सुद्धा प्रेम आणि आदराचंच लक्षण आहे. 

या महत्त्वाच्या दिवशी कोणालाही अवघडल्यासारखं वाटावं, असं आमिरला वाटत नव्हतं. आमिरचे आजही त्याच्या दोन्ही माजी पत्नींसोबत खूप चांगले संबंध आहेत. ते सर्वजण 'पानी फाऊंडेशन'च्या माध्यमातून आजही एकत्र काम करतात," असं स्पष्टीकरण त्याने दिलं.

अगदी साध्या पद्धतीने लग्न

लग्नाच्या सोहळ्याबद्दल अमीनने सांगितलं, "लग्नात कोणताही पारंपरिक विधी, संगीत किंवा मोठा कार्यक्रम नव्हता. आमिरच्या घरीच सगळं अगदी साध्या पद्धतीने झालं. दोन्ही कुटुंबं आणि जवळचे मित्र-मैत्रिणी एकत्र बसलो, गप्पा मारल्या, हसलो आणि छान वेळ घालवला. गौरीचे वडील रॉबर्ट बॉबसह तिचं कुटुंबही लग्नाला उपस्थित होतं. गौरीचे कुटुंबीय खूप साधे आणि प्रेमळ आहेत. ते आमिरवर खूप प्रेम करतात आणि त्यांना त्याचा अभिमान आहे," असं अमीन म्हणाला.

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट

आमिर खानने गेल्या वर्षी त्याच्या ६०व्या वाढदिवशी गौरी स्प्रॅटची ओळख मीडियाला करून दिली होती. गेल्या १८ महिन्यांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे. १९८६ मध्ये त्याने रीना दत्ताशी लग्न केलं होतं, पण २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना जुनैद आणि इरा ही दोन मुलं आहेत. त्यानंतर २००५ मध्ये त्याने दिग्दर्शिका किरण रावशी लग्न केलं आणि २०२१ मध्ये ते वेगळे झाले. त्यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे. गौरी स्प्रॅटचंही हे दुसरं लग्न असून, तिला पहिल्या लग्नापासून क्विन (५) नावाचा एक मुलगा आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Rajinikanth Charity Promise: 'कुटुंबाला एक पैसाही देणार नाही', हॉटेलच्या चर्चेदरम्यान रजनीकांत यांचा जुना व्हिडिओ व्हायरल
Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, बिश्नोई गँगची सलमान खानच्या मित्रांना धमकी