
Priyadarshini Indalkar: कलाकारांचा चित्रपट किती चालला यावर तो किती यशस्वी झाला हे ठरवलं जात. प्रियदर्शनी या अभिनेत्रीने याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. ती म्हणाली की, 'प्रत्येक कलाकाराचा प्रवास वेगवेगळा असतो. काहींचा पहिला चित्रपट फार चालतो. पहिल्या चित्रपटातच एखादा कलाकार 'स्टार' होतो. तर काही कलाकारांना १०० चित्रपटांनंतर घवघवीत यश मिळतं. किती चित्रपटांनंतर कलाकाराला यश मिळतं किंवा दिग्दर्शक, निर्माता कलाकाराच्या नावाचा विचार करतात का, या निकषांवरून कलाकाराचा दर्जा ठरत नाही. तसंच एका चित्रपटातून कलाकार चांगला की वाईट हेसुद्धा ठरत नसतं.'
प्रियदर्शनी हिला मराठी सिने सृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याबाबत बोलताना तिने म्हटलं आहे की, आघाडीच्या १० अभिनेत्रींच्या यादीमध्ये माझं नाव असल्यास मी समाधानी आहे. माझं नाव यादीत पहिलंच असावं असं काही नाही. मनोरंजनसृष्टीतील काम हि एक मॅरेथॉन आहे. मीसुद्धा या मॅरॅथॉनचा भाग असून प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार धावण्याचा प्रयत्न करत आहे. मीसुद्धा पूर्ण ताकदीनं या मॅरेथॉनमध्ये धावण्याचा प्रयत्न करते आहे. ही मॅरेथॉन जिंकण्यापेक्षा त्यात टिकून राहणं महत्त्वाचं आहे.'
प्रियदर्शनी हिने स्वतःच्या अभिनयाने तिची ओळख तयार केली आहे. तिच्या भूमिका निवडीचं स्वातंत्र्य दिल आहे. 'चित्रपट स्वीकारताना माझी प्रतिमा मुद्दाम जपण्याचा किंवा तोडण्याचा मी प्रयत्न करत नाही. मला चित्रपटांमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारायच्या आहेत. एखादी भूमिका साकारताना त्यातलं आव्हान मला आकर्षित करतं. चाकोरीबद्ध कामात मला अडकायचं नाही', असं तीन म्हटलं आहे.
अलीकडच्या काळात प्रियदर्शनी हिच्या नावाचा अनेक निर्माते दिग्दर्शक काम करत आहेत. तिच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. याबाबत तीने म्हटलं आहे की, 'सध्या मला अनेक चांगल्या प्रोजेक्ट्ससाठी विचारणा होत आहे. माझ्या नावाचा विचार चित्रपटकर्ते, निर्मात करत आहेत, याचा मला आनंद आहे. या वर्षी माझ्या अनेक चांगल्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे कामाच्या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान मानते.' तिला वेगवेगळ्या भूमिका निभवायच्या असून चाकोरीबद्ध कामात गुंतायचं नाही.