War 2 Twitter Reviews : ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरच्या सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया, म्हणाले पहिला भाग तर...

Published : Aug 14, 2025, 10:26 AM IST

मुंबई : ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर स्टारर सिनेमा ‘वॉर-2’ नुकतान सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच सिनेमाला सुरुवातीला प्रेक्षकांची गर्दी दिसण्यासह आता त्याबद्दल संमीश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

PREV
15
‘वॉर-2’ सिनेमा अखेर प्रदर्शित

ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘वॉर-2’ अखेर रिलीज झाला आहे. रिलीजनंतर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी गेल्याचे दिसून आले. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी याने केले आहे.

25
शो पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

सिनेमा पाहण्यासाठी गुरुवारी पहाटे 4 वाजताच्या शो ला देखील प्रेक्षकांनी गर्दी केली होती. धमाकेदार अ‍ॅक्शन, ड्रामा असणारा सिनेमा रिलीज झाल्याच्या आनंदात काहींनी फटाके तर पूजा देखील थिएटरबाहेर केली. पण सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर सिनेमासाठी युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.

35
सिनेमासाठी रिव्हू

कलाकारांच्या चाहत्यांनी सिनेमाचा रिव्हू देत म्हटले की, चित्रपटाचा पहिला भाग अतिशय धमाकेदार अ‍ॅक्शनने भरलेला आहे. तर काहींनी म्हटले की, एन्ट्री सिन्स फारच मस्त आहेत. याशिवाय रजनीकांत यांचा नुकतान रिलीज झालेला सिनेमा 'कुली' ला 'वॉर-2' सिनेमा टक्कर देईल. एनटीआरचा डान्सही पाहण्यासारखा आहे.

45
सिनेमाबद्दल ट्विटर रिव्हू

एका युजरने लिहिले की, “सिनेमाचा पहिला भाग चांगला आहे.पण दुसरा भाग “अगदी स्लो आहे. एकूणच एनटीआरचा चाहता असल्याने त्याने अतिशय दमदार काम केले आहे." दुसऱ्याने लिहिले की, “सिनेमाची कथा आधीच्या स्पाय युनिव्हर्स फिल्मसपेक्षा थोडी वेगळी आहे. पण पूर्णपणे त्याला न्याय देता आलेला नाही.” तिसऱ्याने लिहिले की, “सिनेमा चांगलाही नाही आणि वाईटही नाही. यामुळे एनटीआरच्या चाहत्यांनी सिनेमा पाहण्यापूर्वी तुमच्या अपेक्षा काय आहेत हे पाहा. कारण काही ठिकाणी तुम्हाला काम आवडेल पण काही येथे तुम्ही संतप्त व्हाल.”

55
कियारा अडवाणीची दमदार भूमिका

वॉर-2 सिनेमात ऋतिक रोशन, ज्युनिअर एनटीआरसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकली आहे. हा सिनेमा आजच (14 ऑगस्ट) रिलीज करण्यात आला आहे. सिनेमा जगभरात हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमासाठी मोठ्या प्रमाणात अ‍ॅडव्हान्स बुकिंगही प्रेक्षकांनी केले होते.

Read more Photos on

Recommended Stories