Daya Dongre Passes Away: दया डोंगरे यांचं निधन, पडद्यावरील ‘खष्ट सासू’ हरपली

Published : Nov 03, 2025, 06:46 PM IST
Daya Dongre

सार

Daya Dongre Passes Away: ज्येष्ठ मराठी अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. एकेकाळी खलनायकी सासूची भूमिका गाजवणाऱ्या दया डोंगरे यांनी गायनातून अभिनयात प्रवेश करत मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

Veteran Actress Daya Dongre Passes Away: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. दया डोंगरे यांनी आपल्या अभिनयाने मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमठवला होता. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायकीचे प्रतिकात्मक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे.

गायनातून अभिनयाकडे

दया डोंगरे केवळ उत्तम अभिनेत्री नव्हत्या तर उत्कृष्ट गायिका देखील होत्या. सुरुवातीला त्यांनी गायन क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला होता. शालेय जीवनापासूनच त्यांनी शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत शिकले. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक आणि एकांकिका स्पर्धा जिंकून आपले कौशल्य सिद्ध केले.

पण अभिनयाची आवड निर्माण झाल्यावर त्यांनी नाट्य क्षेत्राकडे लक्ष दिले. अभिनयाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्लीमध्ये गेल्या. शिक्षण सुरु असतानाच त्यांच्यावर संसाराची जबाबदारी आली, पण पती शरद डोंगरे यांनी त्यांच्या कलेच्या आवडीला खंबीर साथ दिली.

पडद्यावरील खास भूमिका

दया डोंगरे यांनी विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये स्मरणीय भूमिका साकारल्या.

दूरदर्शनवरील गजरा मालिकेतून त्यांनी लोकप्रियता मिळवली.

खट्याळ सासू, नकाब, लालची, चार दिवस सासूचे, कुलदीपक या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खास्ट सासूची भूमिका प्रभावीपणे निभावली.

तुझी माझी जमली जोडी रे, नांदा सौख्य भरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी या मालिकांमधील त्यांचे अभिनयाचे प्रदर्शन प्रेक्षकांच्या आठवणीत राहिले.

मराठी सोबतच त्यांनी आश्रय, जुंबिश, नामचीन, दौलत कि जंग या हिंदी सिनेमांतही काम केले.

दया डोंगरे यांचे अभिनयाने पडद्यावर निर्माण केलेले अमिट ठसा आणि रसिकांच्या मनावर पाडलेली छाप नेहमीच आठवणीत राहणार आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!
एका बिल्डिंगच्या किंमतीएवढी गाडी विकी कौशलने केली खरेदी, किंमत वाचून बघाल आभाळाकडे