"गेल्या दहा वर्षांपासून या संस्थेसोबत संलग्न"...करीना कपूरने शेअर केली भावनिक पोस्ट

युनिसेफने सांगितले की, करीना कपूर 2014 पासून संस्थेशी जोडली गेली आहे. मुलांचे हक्क, आरोग्य, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या मुद्द्यांवर काम करण्यासाठी ती आमची साथ देणार आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानला युनिसेफ इंडियाची ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे. युनिसेफने सांगितले की, करीना कपूर 2014 पासून संस्थेशी जोडली गेली आहे. मुलांचे हक्क, आरोग्य, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या मुद्द्यांवर ती आमच्या सोबत काम करणार आहे. करीना सोबतचे मागील दहा वर्ष खूप महत्वपूर्ण राहिले आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना करीना कपूर म्हणाली की, आजचा दिवस तिच्यासाठी खूप भावनिक आहे. मी 10 वर्षांपासून या संस्थेशी संलग्न आहे. या दहा वर्षांत मी मुलांच्या हक्कांसाठी काम केले आहे. भविष्यातही मी या संस्थेशी पूर्ण निष्ठेने जोडून राहीन. आम्ही आतापर्यंत केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे.

करीना कपूरने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये काय लिहिले ?

माझ्यासाठी भावनिक दिवस... युनिसेफ इंडियाची ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाल्याचा मला सन्मान वाटतो. युनिसेफ इंडियासोबत गेल्या 10 वर्षांपासून काम करणे खरोखरच समृद्ध आणि ज्ञानवर्धक आहे. आम्ही केलेल्या कामाचा मला अभिमान आहे आणि मी बाल हक्कांचा प्रचार आणि संरक्षण करण्यासाठी तसेच सर्व मुलांच्या समान भविष्यासाठी काम करण्याचा माझा निर्धार आहे.

देशभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी अथक परिश्रम करणाऱ्या संपूर्ण टीमचे विशेष आभार.दररोज वेगळे काम करण्यात आणि लोकांची सेवा करण्यात मला आनंद मिळतो. गौरांशी, कार्तिक, विनिशा आणि नाहिद यांचे युनिसेफ इंडिया परिवारात आमचे नवीन युवा वकील म्हणून स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.

Share this article