Triptii Dimri Upcoming Movies: 31 वर्षीय बॉलिवूडची 'अॅनिमल' गर्ल तृप्ती डिमरी 2017 पासून तृप्ती सातत्याने सिनेमांमध्ये काम करत आहे. 2018 मध्ये आलेल्या 'लैला मजनू'मधून तिला ओळख मिळाली. चला, जाणून घेऊया तृप्तीच्या आगामी सिनेमांबद्दल...
हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे, ज्यात तृप्ती डिमरी पहिल्यांदाच माधुरी दीक्षितसोबत काम करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी करत आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये नाही, तर थेट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज केला जाईल. याची रिलीज डेट 2026 मध्ये आहे, पण तारीख अजून ठरलेली नाही.
25
२. परवीन बाबी बायोपिक
1970 च्या दशकातील लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री परवीन बाबी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. 'द स्काय इज पिंक' फेम सोनाली बोस या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाणार आहे. प्रदर्शनाची तारीख अजून ठरलेली नाही.
35
३. स्पिरिट
हा तेलुगू सिनेसृष्टीतील एक पॅन-इंडिया ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. 'अॅनिमल' फेम संदीप रेड्डी वांगा याचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात पहिल्यांदाच प्रभाससोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 5 मार्च 2027 रोजी रिलीज होईल.
ब्लॉकबस्टर 'अॅनिमल'च्या या सीक्वलमध्ये तृप्ती डिमरीची एन्ट्री जवळपास निश्चित मानली जात आहे, कारण पहिल्या भागात तिचं पात्र जिवंत होतं. रणबीर कपूरसोबतच्या या ॲक्शन ड्रामामध्ये तिच्या पुनरागमनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
55
५. विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ पार्ट २
2024 मध्ये आलेल्या 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या कॉमेडी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बरं यश मिळालं होतं. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर या सिनेमाच्या एंड क्रेडिटमध्ये दुसऱ्या भागाचे संकेत दिले होते. मात्र, दिग्दर्शक राज शांडिल्य किंवा निर्मात्यांनी अद्याप यावर कोणतंही अपडेट दिलेलं नाही.