
राजा शिवाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. या चित्रपटाचे बजेट ७५ कोटींचे होते. यामध्ये रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, अभिषेक बच्चन आणि संजय दत्त यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना घेतलं होत. आपण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
राजा शिवाजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत कमाई केली आहे. या चित्रपटाचा पहिल्या दिवशीचा गल्ला हा १२.४ कोटींचा झाला होता. हा आकडा मराठी चित्रपटांसाठी सर्वात मोठा आकडा मानला जातो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०५.६८ कोटींची कमाई केली. भारतात ग्रॉस कलेक्शन हे १२४.७ कोटी झाले.
या चित्रपटाने जगभरात चांगले पैसे कमावले आहेत. त्यांनी जवळपास १२९.७ कोटींची कमाई संपूर्ण जगभरात केली. या चित्रपटाने त्यांच्या खर्च झालेल्या पैशांपेक्षा तर नक्कीच जास्तीची कमाई केली. या चित्रपटाने १०५. ६८ कोटींची कमाई केली, यामुळे गुंतवणुकीवर ₹३०.६८ कोटी परतावा मिळाला, जो ४०.९% परताव्याच्या समतुल्य आहे. या चित्रपटाला भारतीय बॉक्स ऑफिसवर 'प्लस' रेटिंग मिळाले.