
दशावतार हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर पसंद पडत आहे. जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाचं सगळीकडं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून प्रेक्षकांची वाहवा चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्री यांनी मिळवली आहे.
बाबुली मेस्त्रीची ही कथा प्रेक्षकांना आवडली आहे आणि सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. या चित्रपटासोबतच आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट हे दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. या सिनेमांच्या तुलनेत दशावतार चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. विकेंडला बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दुप्पट कमाई केली आहे.
या चित्रपटाने बाकी दोन चित्रपटांच्या मानाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५८ लाख रुपयांची कमाई केली आणि त्यानंतर शनिवारी १.३९ कोटींची कमाई केली असून पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी जवळपास दुप्पट कमाई केली आहे. रविवारी तर या चित्रपटाने दोन दिवसांचे रेकॉर्ड तोडून टाकले.
रविवारी जवळपास २.४ कोटींची कमाई दशावतार चित्रपटाने केली आहे. मुंबई, पुणे सोबत महाराष्ट्रातील इतर ठिकाणी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी चित्रपटगृह फुल झाले असून चित्रपटाने आपली ताकद पहिल्या आठवड्यात दाखवून दिली आहे. या चित्रपटाने एकूण ४.३७ कोटींची कमाई केली आहे.