
दिवंगत उद्योगपती संजय कपूरच्या संपत्तीवरून मोठ्या प्रमाणावर वाद सुरु असल्याचं दिसून आलं आहे. यामुळं त्याची एक्स पत्नी करिश्मा कपूर परत एकदा चर्चेत आली आहे. करिश्मा आणि संजयच्या मुलांनी संपत्तीवरून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरु असून त्यामुळं माध्यमांमध्ये चर्चांना तोंड फुटलं आहे.
मुंबई: संजय कपूरसोबत लग्न करण्याच्या आधी करिश्मा कपूर ही एका अभिनेत्याला डेट करत होती. त्यावेळी तिने सलमान खान आणि अमीर खान यांच्यासोबाबत काम केलं आहे. करिश्मा अभिनेता अजय देवगणसोबत जिगरी, सुहाग आणि संग्राम सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. त्यानंतर, या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.
'आम्ही दोघं फक्त चांगले मित्र आहोत आणि त्याहून अधिक काही नाही. मला माहित नाही त्याच्या मनात काय आहे, त्याने मला कधीही सांगितलं नाही. आम्ही एकत्र अनेक चित्रपट केले आहेत आणि आमची जोडी चाहत्यांनाही आवडते. प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं आहे, या सर्व अफवा पसरवणारे मूर्ख लोक कोण आहेत, सध्या मी स्वतः लहान मुलीसारखी आहे.' असं यावेळी बोलताना करिश्मा म्हणाली होती.
अजय देवगांसोबत करिश्मा त्यावेळी जेह वाडियाला डेट करत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यावेळी तिने बोलताना म्हटलं होतं की, 'मला लंडनहून जेहचा फोन आला, तो म्हणत होता की मी हे सर्व काय ऐकतोय, म्हणूनच तू अभिनेत्री झाली आहेस. तो माझा मित्र आहे, आता मला समजत नाही की तो भारतात आल्यावर मी त्याला कसं सामोरं जाईन.'