राजेश खन्ना यांनी दुसरं लग्न का केलं? दुसऱ्या बायकोने केला 'हा' दावा

Published : Aug 17, 2025, 09:08 AM IST
rajesh khanna anita advani

सार

राजेश खन्ना यांनी अनिता अडवाणी यांच्याशी गुपचूप लग्न केल्याचा खुलासा अनिता यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांनी सांगितलं की, घरातल्या एका छोट्या मंदिरात त्यांनी लग्न केलं.

मुंबई - बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना एके काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचं डिम्पल कपाडिया यांच्याशी लग्न झालं होतं. त्यानंतर १९८२ मध्ये हे जोडपं एकमेकांपासून वेगळं झालं होतं. . त्यानंतर अभिनेत्री अनिता अडवाणी राजेश खन्ना यांच्यासोबत गेली. आता सुपरस्टारच्या लग्नाला अनेक वर्ष होऊन गेली आहेत. अनिता यांनी सांगितलं होत की राजेश खन्ना यांनी त्यांच्याशी गुपचूप लग्न केलं होत.

अनिता काय म्हणाल्या?

अनिता यांनी दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केलं आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, 'आम्ही गुपचूप लग्न केलं, पण चित्रपटसृष्टीत कोणीही या गोष्टींबद्दल उघडपणे बोलत नाही. प्रत्येकजण म्हणतो की आम्ही मित्र आहोत किंवा आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत किंवा आणखी काही.' 'मी त्यांच्यासोबत राहतेय ही बातमी आधीच मीडियामध्ये आली होती, म्हणून आम्हाला दोघांनाही जाहीरपणे लग्नाची घोषणा करण्याची गरज वाटली नाही. आमच्या घरात एक लहान मंदिर होतं. मी सोन्याचे आणि काळ्या मण्यांनी बनवलेलं मंगळसूत्र बनवलं होतं .

त्यांनी मला ते घालायला लावलं. मग त्यांनी सिंदूर लावला आणि म्हणाला की आजपासून तू माझी जबाबदारी आहेस. अगदी असंच एका रात्री आमचं लग्न झालं. मी डिंपल कपाडियाच्या आधी त्यांच्या आयुष्यात आली. पण त्यावेळी आम्ही लग्न केलं नाही कारण मी खूप लहान होते. अखेर मी जयपूरला परत आलो.'

अनिता राजेश यांच्या अंत्यसंस्काराला का गेल्या नाही? 

अनिता यांनी सांगितलं की, 'राजेश यांच्या घरच्यांनी मला आत येण्यापासून रोखण्यासाठी तिथे बॉडीगार्ड उभे केले होते. मला माझ्या मित्रांकडून हे कळलं. जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी जाणार आहे, तेव्हा त्यांनी मला आत जाऊ दिलं नाही. तरीही त्यांनी सांगितलं की, जर काही झालं तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण मी स्तब्ध झाले आणि विचारलं की, हे सर्व का घडत आहे?'

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?