
Sunil Shetty Upcoming Movie : सुनील शेट्टी स्टारर 'केसरी वीर'चा प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. पूर्वी हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचे अधिकृत वितरक पॅनोरमा स्टुडिओने घोषणा केली आहे की 'केसरी वीर' आता २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होईल. पॅनोरमा स्टुडिओने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत नवीन प्रदर्शन तारीख जाहीर केली.