"काही लोकांना वाटतं सगळ्या मुली त्यांच्यासाठी उपलब्ध..." प्राची पिसाटला प्राजक्ता दिघे आणि शिल्पा नवलकर यांचा खंबीर पाठिंबा!

Published : May 26, 2025, 11:17 PM IST
prachi pisat in sudesh mhashilkar

सार

मराठी अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर सुदेश म्हशिलकर यांच्या वादग्रस्त मेसेजेसचे स्क्रीनशॉट सार्वजनिक केले आहेत. या प्रकरणी प्राजक्ता कुलकर्णी दिघे आणि शिल्पा नवलकर यांनी प्राचीला पाठिंबा दिला आहे.

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेतील अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्या वादग्रस्त मेसेजेसचे स्क्रीनशॉट प्राचीने सार्वजनिक केल्यानंतर, या प्रकरणी आता 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे आणि लेखिका शिल्पा नवलकर यांनी प्राचीला खंबीर पाठिंबा दिला आहे.

 

 

काय आहे नेमकं प्रकरण?

२४ मे रोजी प्राची पिसाटने फेसबुकवर काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. या स्क्रीनशॉटमध्ये सुदेश म्हशिलकर यांनी प्राचीला, "तुझा नंबर पाठव... तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये... कसली गोड दिसतेस" आणि "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह" असे मेसेज केल्याचे दिसत आहे. प्राचीने हे स्क्रीनशॉट शेअर करताना म्हशिलकर यांच्यावर निशाणा साधला. तिने लिहिले, "आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली... बायकोचा नंबर असेलच... तीही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का सुदेश म्हशिलकर!"

 

 

प्रारंभी अनेकांनी सुदेश म्हशिलकर यांचे अकाउंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली, पण प्राचीने आणखी काही स्क्रीनशॉट शेअर करत हे अकाउंट हॅक नसल्याचे स्पष्ट केले. २५ मे रोजी इन्स्टाग्रामवर तिने लिहिले, "हो, आहे मी गोड. चला आता विषय संपवूया सुदेश म्हशिलकर. इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ नसेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्से सांगू शकते."

प्राचीने एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे की, तिला ही पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव आणला जात आहे आणि गप्प बसण्यास सांगितले जात आहे. पण सुदेश म्हशिलकर जोपर्यंत जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत हा विषय संपणार नाही, अशी तिची भूमिका आहे.

अभिनेत्रींचा प्राचीला पाठिंबा

प्राचीने इंडस्ट्रीतील हे कटू वास्तव मांडल्यानंतर अनेक लोकप्रिय मराठी अभिनेत्री तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.

प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी marathiserials_official या इन्स्टाग्राम पेजने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत प्राचीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "प्राची एकदम छान केलंस ही पोस्ट शेअर करुन. कारण इंडस्ट्रीमधील काही लोकांना वाटतं की सगळ्याच मुली अशा असतात आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. हा त्यांचा गैरसमज दूर व्हायलाच हवा. काही लोकांमुळे आपली इंडस्ट्री बदनाम आहे, ती तरी होणार नाही. आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करुन आमच्या फॅमिलीसोबत अगदी प्रामाणिकपणे राहतो." प्राजक्ताच्या या कमेंटला प्राचीने, "ताई, खूप खूप धन्यवाद. मलाही तुमचा अभिमान आहे. एक आई म्हणून तुम्ही कायमच आजूबाजूच्या अनेक मुलींना धाडसी होण्यासाठी प्रेरणा दिली आहे," असे उत्तर दिले.

'ठरलं तर मग' मालिकेच्या लेखिका आणि अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनीही प्राचीच्या फेसबुक पोस्टला पाठिंबा दिला. शिल्पा यांनी, "Way to Go प्राची, गप्प नाही बसायचं," असे म्हटले. यावर प्राचीने, "शिल्पा ताई गेल्या १२ तासात तू पहिलीच महिला असशील जिने मला 'गप्प बस' असे नाही सांगितले. धन्यवाद," असे उत्तर दिले. अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिनेही प्राचीला पाठिंबा दर्शवला आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?